Sign In New user? Start here.

प्रेम स्वरूप आई....!

Untitled Document

प्रेम स्वरूप आई, वास्तल्य रूप आई,
जन्मास आणिले आम्हा, होऊ कसे उतराई !!धृ!! प्रेम स्वरूप आई....

लावलीस तू गं माया, जपलेस तूच आम्हा,
वळविलेस अक्षरा, म्हणूनी श्री गणेशा !!१!! प्रेम स्वरूप आई....

वाढविलेस धरून पोटी, होऊनी तू गं कष्टी,
विसरणार नाही आम्ही, त्या बालपणीच्या गोष्टी !!२!! प्रेम स्वरूप आई....

झालो कसे गं मोठे, नाही आम्हांस कळले,
झालो सुखी संसारी, शतमार्गी सर्व वळले !!३!! प्रेम स्वरूप आई....

पाहूनिया आमुचे, संसार ते सुखाचे,
आनंद होई तुजला, बघूनी नातवांते !! ४ !! प्रेम स्वरूप आई....

आज हा असे जगाचा, जागतिक मातृदिन,
काय आम्ही देणार ? तुज चरणी नतमस्तक !!५!! प्रेम स्वरूप आई....

कसे तुझे उपकार, विसरू सांग आई,
शतजन्मासाठी देवा, हे नाते असेच राही...!!६!! प्रेम स्वरूप आई....

असू दे तुझे गं आशिष, सदैव आम्हासाठी,
आम्ही भाऊ-बहिणी आणि नातवंड सारी,
देवा अशीच आई, मिळू दे जन्मोजन्मी,
माया अशीच लाभो त्रिवार तुला वंदूनी...!!७!! प्रेम स्वरूप आई....

सोनाली जोशी
 

cssmothersday