Sign In New user? Start here.

‘मदर्स डे’ कशासाठी...?

आई...! हा शब्द आणि ही व्यक्ती कुणाला माहित नाही अशी व्यक्ती सापडणे कठीणच. जी कशाचीही अपेक्षा न करता माझ्यावर प्रेम करते, माझ्या जीवन विकासाची चिंता करते ती आई..! आपल्या कुटुंबात इतर सर्व लोकांपैकी आईची भूमिका वेगळी आणी विशेष महत्वाची असते. सकाळी लवकर उठण्यापासून तर रात्री झोपेपर्यंत जी आपली काळजी घेते ती आई. माझ्या परीक्षेच्या काळात माझ्यासोबत रात्रभर जागणारी ती माझी आई. जी माझे हित कशात आहे ते ओळखते व त्यासाठी सतत आग्रही असते ती माझी आई. भगवंत आणि आई या दोघांचे प्रेम निरपेक्ष आणि निराकांक्ष आहे. म्हणूनच त्यांच्या चरणावर आपण नतमस्तक होतो, अशी जी आई आहे तिच्यासाठी, तिला शुभेच्छा देण्यासाठी ‘मदर्स डे’ हा वर्षातला एकच दिवस का असावा, याचा विचार मनात अनेकदा येतो.

आई ही एक अशी व्यक्ती आहे जिचं ऋण आपण हजारो जन्म घेऊन सुद्धा फेडू शकत नाही. तसं पहायला गेलं तर आपल्या संस्कृतीनुसार आपण दररोज आईच्या चरणी नतमस्तक होऊन तिचा आशिर्वाद घ्यायला हवा. आपण वयाने आणि शरीराने कितीही मोठे झालो तरी आईसाठी आपण लहानच असतो. ती आपण लहान असतांना जेवढी आपली काळजी करते, तेवढीच काळजी ती आपण मोठे झाल्यावरही घेतेच. मग तिला आठवण्यासाठी किंवा शुभेच्छा देण्यासाठी हा एकच दिवस का निवडावा हा प्रश्न सतत माझ्या मनाला पोखरत असतो.

योगेश पाटील 

cssmothersday