Sign In New user? Start here.
जिगरवाल्या' गुरूचा 'अॅक्शन' तडका

जिगरवाल्या' गुरूचा 'अॅक्शन' तडका

 
‘मुंबई पुणे मुंबई-2 सात दिवसात सात कोटीं
 
'जिगरवाल्या' गुरूचा 'अॅक्शन' तडका

स्टाईल असो वा रोमान्स असो… अॅक्शन असो वा गाणे असो! यातली प्रत्येक गोष्ट हटके रुपात प्रेक्षकांसमोर सादर करण्याची कला फक्त संजय जाधव यांना चांगलीच अवगत आहे, असं म्हणायला हरकत नाही. दुनियादारी, प्यारवाली लव्हस्टोरी, तू ही रे यांसारखे रोमँटिक सिनेमे देणारे संजय जाधव नवीन वर्षात मात्र अॅक्शन तडका असलेला गुरु हा सिनेमा घेऊन येत आहेत. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. इरॉस इंटरनॅशनल, बॅगपायपर सोडा आणि ड्रीमिंग ट्वेंटी फोर सेव्हन यांनी मिळून सिनेमाची निर्मिती केली आहे.

तरुणांच्या गळ्यातलं ताईत असलेला अंकुश चौधरी सध्या युथचा स्टाईल आयकॉन झाला आहे. गुरूच्या ट्रेलरमधून अंकुशची "गुरु स्टाईल" दिसून येते आहे. त्याने हातात घातलेला कडा तसेच त्याचे रिफ्लेक्टर गॉगल्स घालण्याची स्टाईल युथ मध्ये खूप फ़ेमस झाली आहे. या ट्रेलर मधून अंकुशचे जबरदस्त अॅक्शन सिक्वेन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी साउथ तडका अॅक्शन सिक्वेन्स दिला गेला आहे. अंकुश सोबतचा उर्मिला कानेटकर हीचा मँगोडॉली लूक ही आपल्याला यातून पाहायला मिळतो आहे.

अमितराज यांच्या धमाल म्युझिकची फोडणी मिळालेल्या या ट्रेलरमधून आपल्याला अॅक्शन, रोमान्स, कॉमेडी, असा मालमसाला दिसून येतो आहे. नायक, नायिका आणि खलनायक अशी ही त्रीसुत्री मालिका 'गुरु' या सिनेमात पाहायला मिळणार असली तरी या सिनेमाचा खलनायक कोण असणार आहे हे मात्र अजूनही पडद्याआडच आहे. एंटरटेनमेंटचं कमप्लीट पॅकेज असलेला डॅशिंग गुरु प्रेक्षकांचा निखळ मनोरंजन करेल हे मात्र या ट्रेलरवरून दिसून येते आहे. सध्या सोशल साईटवर गाजत असलेला अंकुश चा गुरु अवतार पाहण्यासाठी आपल्याला २२ जानेवारीची वाट पाहावी लागणार आहे, येत्या २२ जानेवारीला गुरु हा सिनेमा महाराष्ट्रासह सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

--------------------