Sign In New user? Start here.
ravi jadhav rap up party

रवी जाधव यांच्या पहिल्या हिंदी चित्रपटाची रॅप-अप पार्टी

 
 
 
रवी जाधव यांच्या पहिल्या हिंदी चित्रपटाची रॅप-अप पार्टी

टाईमपास, बालक पालक असे हिट चित्रपट देणारे दिग्दर्शक रवी जाधव यांचा पहिला बॉलिवूड चित्रपट ‘बॅंजो’चं शूट नुकतंच पूर्ण झालं. ह्यावेळी रवी जाधव, रितेश देशमुख, धर्मेश यांच्यासह सिनेमाच्या संपूर्ण टीमने सेलिब्रेशन केलं. रवी जाधव यांनी आपल्या सोशल नेटवर्किंगच्या पोस्टवर म्हंटल आहे की सलग नऊ रात्री आणि १२ तास शूटींग करून सुध्दा या टिमचा उत्साह टिकून होता.

इरॉस इंटरनॅशनल सिनेमाची निर्मिती करत असून ‘बॅंजो’मधून महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन घडणार आहे.या चित्रपटात मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री नर्गिस फाख्री ही जोडी या सिनेमात प्रमुख भूमिकेत पाहायला मिळेल.

मराठी चित्रपटसृष्टीत आपल चांगला काम दाखवून त्यांनी मराठी माणसामाध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आता बॉलीवूड मध्ये या चित्रपटाव्दारे त्यांची एन्ट्रीं किती दमदार होते हे लवकरच समजेल.