Sign In New user? Start here.

प्रेमाचे विविध रंग दाखवणारा ‘चाहतो मी तुला’

chahato me tula new marathi movie

लग्नाच्या माहोलात लाँच झाला 'मिस्टर अँड मिसेस सदाचारी'चा धमाकेदार ट्रेलर

 
‘मुंबई पुणे मुंबई-2 सात दिवसात सात कोटीं
 
प्रेमाचे विविध रंग दाखवणारा ‘चाहतो मी तुला’

रुपेरी पडद्यावर आजच्या तरुण पिढीला अपील होतील अशा चित्रपटांची निर्मिती सध्या होऊ लागली आहे. या कलाकृतीला प्रेक्षक वर्गाने नेहमीच मनापासून दाद दिली आहे. प्रेमाचे विविध रंग दाखवणारा ‘चाहतो मी तुला’ हा कविशा प्रोडक्शनचा आगामी चित्रपटही याच धाटणीचा असून नात्यातील हळूवार क्षणांना रेखाटणारा हा फ्रेश चित्रपट १५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. बॉलीवूडमधील प्रसिद्ध निर्माते भरत शाह यांनी ‘चाहतो मी तुला’ या चित्रपटाद्वारे प्रस्तुतकर्ता म्हणून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं आहे.

प्रेमाला वय, काळाचे भान नसते असे म्हणतात. नव्याने प्रेमाची चाहूल लागलेल्या विवेक व विद्याची ही गोष्ट असून त्यांच्या भावना त्यांचे कुटूंबीय समजून घेतात का? त्यांच प्रेम त्यांना मिळणार की त्यांना विरह सहन करावा लागणार? याची कथा ‘चाहतो मी तुला’ या चित्रपटात पाहता येणार आहे. यातून मेघन जाधव व मितीला मिरजकर ह्या नव्या फ्रेश जोडीची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर रंगणार आहे. भरत शाह प्रस्तुतकर्ते असलेल्या या चित्रपटाच्या निर्मिती-दिग्दर्शनाची तसेच कथा पटकथा लेखनाची धुरा विशाल पुवार यांनी सांभाळली आहे,

विशाल पुवार व सत्येंद्र पुवार निर्मित या चित्रपटाचे छायांकन सी जगन यांच असून संवाद महेंद्र पाटील यांनी लिहिले आहेत. रविंद्र लोले व मेवालाल मौर्या यांनी कलादिग्दर्शनाची तर नृत्यदिग्दर्शनाची जबाबदारी राजू-शबाना यांनी सांभाळली आहे. चित्रपटातील गीतांना मिलिंद मोरे यांनी संगीतबद्ध केले आहे. चित्रपटात मेघन जाधव, मितीला मिरजकर यांच्यासह प्रसाद ओक, श्रुती मराठे, सुलेखा तळवलकर, भारत गणेशपुरे, विद्याधर जोशी, आनंदा कारेकर, या कलाकारांच्या भूमिका आहेत.

१५ जानेवारीला ‘चाहतो मी तुला’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

--------------------