Sign In New user? Start here.

"चौक द रियालिटी" या सिनेमाचा मुहूर्त दिमाखदार संपन्न

chowk the reality film muhurat

"चौक द रियालिटी" या सिनेमाचा मुहूर्त दिमाखदार संपन्न

 
 
 
"चौक द रियालिटी" या सिनेमाचा मुहूर्त दिमाखदार संपन्न

चिंतामणी निर्मित "चौक द रियालिटी" गाव असो कि शहर कित्येक उलढालीचा जणू माहेर ..मात्र हाच चौक गुन्हेगार बनविण्याची आणि बनण्याची शाळा होऊन बसली आहे.चौकातला दादा ते मर्डर असा काहींसा प्रवास गल्ली गल्लीतील पाहायला मिळतोय अशा संवेदनशील विषयावर भाष्य करणारा "चौक द रियालिटी" या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे.

आजच्या वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर युवा वर्गाला संबोधित करण्यासाठी संदेश भोंडवे आणि नरेश भोंडवे यांनी चित्रपटाची निर्मिती करत आहेत .चौक द रियालिटी चित्रपटाची कथा,पटकथा आणि संवाद भरत महाडिक यांनी लिहिले असून दिग्दर्शनही भरत महाडिक हेच करणार आहेत.

त्याचबरोबर चित्रपटात पुण्यातील नवोदित कलाकार राज शेटे,राजू उघडे,संतोष शिंदे,अमित देवकर हे मुख्य भूमिकेत आहेत.या चित्रपटाची पिंपरी-चिंचवड मध्ये लवकर शूटिंग सुरु करण्यात येणार आहे. आज आपला सिनेमा कोणत्या दिशेला चालला आहे.देशाची ताकद असणारी युवा पिढी जर अशी वाईट मार्ग कडे वळत असताना "चौक द रियालिटी" नक्कीच तरुणांना दिशा देणारा ठरेल असे मत निर्माता संदेश भोंडवे आणि नरेश भोंडवे यांनी व्यक्त केले या मुहूर्ताला नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांची प्रमुख उपस्थिती होती.