Sign In New user? Start here.
dagad ek yeskar new documentary

दगड -एक उपेक्षित यसकर

 
 
 
दगड -एक उपेक्षित यसकर

स्वामी ओम फिल्म प्रस्तुत 'दगड- एक उपेक्षित यसकर' शाॅर्ट फिल्म अंधश्रद्धा या विषयावर आधारीत आहे.अंधश्रद्धा हा कधीही न पुसला जाणारा शब्द . आज समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असताना अंधश्रद्धा ही या प्रगतीच्या आड येणारी एक समस्या आहे . भीक मागून जगणारा , "वाडं ग माई " असे म्हणून पोट भरणाऱ्या यसकर समाजाची ही गोष्ट.

एक उपेक्षित समाज म्हणून ओळख ल्या जाणाऱ्या यसकर समाजातील दोन भावडांच्या आयुष्याचे चित्रण करणारी ही शाॅर्ट फिल्म मनाला चटका लावून जाते. दुष्काळाचे सावट नकोसे झालेला हा समाज अजुनही दारोदारी लोकांकडून भीक मागून जगत आहे .शिक्षणापासून वंचित असणारा हा समाज आजही अंधश्रद्धेच्या छायेत जगताना दिसतो याचे हुबेहुब चित्रण या फिल्म मध्ये केले आहे.

दोन लहान भावंडाची ही कथा .आपल्या आजारी आईच्या आयुष्यासाठी धडपडणार्या दोन भावंडांना समाज पार एकटा करून सोडतो . त्यानंतर समाजाची जगण्याची रीत ओळखून स्वतःच्या युक्ती ने याच अंधश्रद्धेचा आधार घेऊन जीवन जगतानाचे चिञण या शाॅर्ट फिल्म मध्ये करण्यात आले. 'राहूल बळवंत ' यांनी कथा , पटकथा लिहिली असून , 'मानसी बळवंत' यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे .बालकलाकार म्हणून तनुज नांगरे , मिहीर या दोन नवीन मुलांची निवड करण्यात आली आहे. राधिका, मनोज , प्रदिप, सागरराज बोदगिरे , आणि विठ्ठल जाधव यांसारखे अन्य कलाकार देखील आहेत. संगीत नचिकेत गोंड यांचे आहे . अंधश्रद्धेपोटी माणूस कोणत्या थराला जावू शकतो . हा संदेश देण्याचा प्रयत्न या शाॅर्ट फिल्म मधून करण्यात आला आहे.हि शॉर्ट फिल्म लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.