Sign In New user? Start here.

मंगेश देसाई आणि विद्या बालनच्या चित्रपटाने उभारली प्रमोशनची गुढी

ek albela film promotion

"मंगेश देसाई आणि विद्या बालनच्या चित्रपटाने उभारली प्रमोशनची गुढी

 
 
 
मंगेश देसाई आणि विद्या बालनच्या चित्रपटाने उभारली प्रमोशनची गुढी

हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची खास ओळख निर्माण केलेले दिवंगत अभिनेता भगवानदादा यांच्या आयुष्यावर आधारित बहुचर्चित 'एक अलबेला' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर या चित्रपटाच्या प्रमोशनची गुढी उभारण्यात आली. येत्या काही दिवसांत वेगवेगळ्या माध्यमांतून चित्रपटाचा प्रचार केला जाणार आहे.

भगवानदादांची भूमिका साकारणारा अष्टपैलू अभिनेता मंगेश देसाई, भगवानदादांच्या पत्नीची भूमिका केलेली अभिनेत्री तेजस्वी पाटील, दिग्दर्शक शेखर सरतांडेल, कार्यकारी निर्माता कुणाल शेट्ये आदी या वेळी उपस्थित होते. किमया मोशन पिक्चर्सच्या मोनीष बाबरे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. गुढी उभारल्यानंतर मंगेश आणि चित्रपटाच्या टीमनं 'भगवानदादा स्टाईल'नं डान्स करून अनोख्या पद्धतीनं भगवानदादांना अभिवादन केलं. अभिनेत्री विद्या बालनचं या चित्रपटातील गीता बाली यांच्या भूमिकेद्वारे मराठीत पदार्पण होत असल्यानं या चित्रपटाविषयी बरीच उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटाच्या टीजरचंही भरपूर कौतुक झालं होतं. तसंच त्याला सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात हिट्सही मिळाल्या होत्या.

'भगवानदादा यांच्यावर आधारित चित्रपट करायला मिळणं ही मोठी संधी आहे. त्याशिवाय हिंदी चित्रपटात यशाच्या शिखरावर असताना विद्या बालन मराठी चित्रपट करतात ही वैशिष्ट्यपूर्ण घटना आहे. मंगेश देसाईनं उत्तम पद्धतीनं भगवानदादा साकारले आहेत. चित्रपटही उत्तम तयार झाला आहे. आता तो रसिकांपर्यंत आणि भगवानदादांच्या चाहत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत,' असं शेखर सरतांडेल यांनी सांगितलं.