Sign In New user? Start here.

मैत्री या नात्यावर भाष्य करणारी रिफ्रेशींग कथा ‘फ्रेंड्स’

friends sanchit and swapnil

मंगेश पाडगावकर यांचे निधन

 
‘मुंबई पुणे मुंबई-2 सात दिवसात सात कोटीं
 
मैत्री या नात्यावर भाष्य करणारी रिफ्रेशींग कथा ‘फ्रेंड्स’

मैत्रीवर आधारित अनेक सिनेमे मराठीत येऊन गेलेत. प्रत्येक सिनेमात मैत्रीची वेगवेगळी रूपे बघायला मिळाली. आता आणखी एक दोन मित्रांची आगळीवेगळी कथा असलेला ‘फ्रेंड्स’ हा सिनेमा येऊ घातला आहे. ज्यात तुम्हाला दोन मित्रांची धमाल-मस्ती, मजा बघायला मिळणार आहे. मराठीतील सुपरस्टार स्वप्नील जोशी आणि सचीत पाटील हे दोघे यात मुख्य भूमिकेत आहेत. दोन मोठे स्टार एकत्र बघायला मिळणार या गोष्टीनेच सध्या या सिनेमाची प्रेक्षकांमध्ये जोरदार उत्सुकता बघायला मिळत आहे. हा सिनेमा १५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे.

आर.मधेश यांनीच या सिनेमाच्या लेखनाची आणि दिग्दर्शनाची अशी दुहेरी जबाबदारी सांभाळलीये. मित्र हे असं व्यक्तीमत्व आहे जे प्रत्येकाच्याच जीवनात असतं. मैत्री प्रत्येकाला जगण्याचा एक वेगळा अर्थ देते. मैत्रीत भांडणं असतातच पण त्याहूनही जास्त असतं ऎकमेकांवरच प्रेम आणि ऎकमेकांवरचा विश्वास... त्यामुळेच मैत्रीवर आधारित सिनेमे काढण्याचा सिने इंडस्ट्रीतील निर्मात्यांना मोह आवरता येत नाही. अशाच दोन जीवलग मित्रांची, त्यांची मैत्रीची, सुख-दु:खांची कहाणी ‘फ्रेंड्स’मधून रूपेरी पडद्यावर येतीये. जी प्रत्येकालाच स्वत:ची कथा वाटेल. मराठीतील दोन लोकप्रिय चेहरे या सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र येत आहेत. त्यांनी याआधीही काही सिनेमात कामे केली आहेत.

स्वप्नील जोशी आणि सचीत पाटील यांच्यासोबत या सिनेमात गौरी नलावडे ही अभिनेत्री बघायला मिळणार आहे. हा सिनेमा रिलिज होण्याआधीच यातील गाणी सुरपहिट ठरली असून ‘फ्रेंड्स’मधील ‘प्रेमिका’ हे स्वप्नील जोशीवर चित्रीत गाणं सध्या चांगलंच गाजत आहे. अमित राज, पंकज पडघन आणि निलेश मोहरीर या तीन दिग्गज संगीतकारांनी या सिनेमाला संगीत दिले असून मंदार चोळकर आणि गुरू ठाकूर यांनी सिनेमाची गीते लिहिली आहेत. संजय केळापुरे, आर.मधेश, प्रेम व्यास आणि मनीष चंदा यांची निर्मिती असलेल्या या सिनेमा कथा आर.मधेश यांची असून संवाद शिरीष लाटकर यांनी लिहिले आहेत. तर या सिनेमाचे सहायक निर्माते शिव राजपुत्रा हे आहेत. सिनेमाचे प्रमोशन पार्टनर्स अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक निशानदार हे आहेत. अ‍ॅक्शन, रोमान्स, फ्रेंडशिप, इमोशन असा मनोरंजनाचं कम्प्लिट पॅकेज असलेला हा सिनेमा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास सज्जा झाला असून येत्या १५ जानेवारीला हा सिनेमा रिलिज होतोय.

--------------------