Sign In New user? Start here.
goa film festival halal fim selected

गोवा फिल्म फेस्टिव्हलमध्ये हलालला उदंड प्रतिसाद

 
 
 
एकतेचं प्रतिक असलेल्या गणवेशावर आधारित असलेला 'गणवेश'

नाविन्यपूर्ण विषयांना न्याय देण्यासाठी मराठी चित्रपटसृष्टी जगभर प्रसिद्ध आहे. याच परंपरेचा पाईक असलेला आणखी एक मराठी चित्रपट रसिक दरबारी येण्यासाठी सज्ज झाला आहे. फॅशन ही काळानुरूप बदलत असली तरी रंगीबेरंगी कपड्यांच्या या फॅशनेबल जगतात गणवेशाचं एक वेगळं महत्व आहे. एकजूट तसंच एकतेचं प्रतिक असलेल्या गणवेशावर आधारित असलेला 'गणवेश' हा चित्रपट येत्या २४ जून पासून आपल्या शहरासोबतच महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या पत्रकार परिषदेसाठी चित्रपटातील कलावंत किशोर कदम, अभिनेत्री स्मिता तांबे, बालकलाकार तन्मय मांडे आणि प्रसिद्ध डीओपी व दिग्दर्शक अतुल जगदाळे हे उपस्थित होते.

'ईरॉस इंटरनॅशनलची प्रस्तुती' आणि 'विजयते एंटरटेन्मेंट प्रॉडक्शन'ची निर्मिती असलेल्या 'गणवेश' या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर अतुल जगदाळे यांनी केलं आहे. दिलीप प्रभावळकर, मुक्ता बर्वे, किशोर कदम, स्मिता तांबे, गुरु ठाकूर, नागेश भोसले, सुहास पळशीकर, गणेश यादव, शरद पोंक्षे, जयंत सावरकर, बाळकृष्ण शिंदे, अरुण गीते, अशोक पावडे, प्रफुल कांबळी आणि बालकलाकार तन्मय मांडे या कलाकारांच्या या चित्रपटात भूमिका आहेत.

मराठी चित्रपटसृष्टीत आजवर सिनेमॅटोग्राफर म्हणून काम पाहणाऱ्या अतुल जगदाळे यांचा दिग्दर्शक म्हणून 'गणवेश' हा जरी पहिला चित्रपट असला तरी लेखनापासून ते सादरीकरणपर्यंत सर्वच पातळीवर त्यांनी कसून मेहनत घेतली आहे. 'गणवेश'बाबत बोलताना ते म्हणाले, ''आजवर रुपेरी पडद्यावर कधीही न आलेला विषय 'गणवेश' या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांसमोर येणार आहे. गणवेशबाबत प्रत्येकाच्या मनात एक वेगळी भावना असते. गणवेशबाबत प्रत्येकाच्या मनात आपुलकीच्या भावनेसोबतच अनेक आठवणी दडलेल्या असतात. या आठवणींना या चित्रपटाच्या निमित्ताने उजाळा मिळेलच. त्यासोबतच एका अर्थपूर्ण गोष्टीच्या माध्यमातून गणवेशचं आजवर कधीही समोर न असलेलं रूप पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर याची कल्पना येते. चित्रपटाच्या विषयाला अनुसरून 'गणवेश'चा ट्रेलर तयार करण्यात आला असून तो प्रेक्षकांना हा चित्रपट पहाण्यासाठी प्रोत्साहित करेल याबाबत शंका नाही. 'गणवेश'च्या माध्यमातून एक दर्जेदार कलाकृती रसिक दरबारी सादर करण्याचा प्रयत्न आमच्या टिमने केला आहे.''

तेजस घाटगे यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादलेखन केलं आहे. मराठीतील आघाडीचे गीतकार अशी ख्याती असलेल्या गीतकार गुरू ठाकूर यांनी या चित्रपटासाठी गीतलेखन केलं असून संगीतकार निहार शेंबेकर यांनी या गीतांना स्वरसाज चढविण्याचं काम केलं आहे. उर्मिला धनगर, तसंच नंदेश उमप या मराठीतील आघाडीच्या गायकांच्या आवाजात संगीतप्रेमींना या चित्रपटातील गीतरचना ऐकायला मिळणार आहेत. मंगेश धाकडे यांचं पार्श्वसंगीत लाभलेल्या या चित्रपटासाठी ज्ञानदेव इंदुलकर यांनी कला दिग्दर्शन केलं आहे. साऊंड डिझायनिंगची जबाबदारी मनीष यांनी सांभाळली असून, रंगभूषा ललित कुलकर्णी, तसंच वेशभूषा स्मिता कोळी यांनी केली आहे. राजेश राव यांनी या चित्रपटातील दृश्यांचं संकलन केलं आहे. हरपाल सिंग आणि रवी कुमार यांनी या चित्रपटातील अॅक्शन तर कार्थिक पाल यांनी नृत्य दिग्दर्शनाचं काम केलं आहे. रवी उंडाळे या चित्रपटाचे मुख्य सहाय्यक दिग्दर्शन म्हणून काम पाहिलं असून राजेंद्र विश्वनाथ कुलकर्णी आणि शैलेंद्र घडे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. राजू झेंडे या चित्रपटाचे निर्मिती व्यवस्थापक आहेत.