Sign In New user? Start here.
half ticket digital poster revile

हाफ तिकीट’च डिजिटल पोस्टर रिव्हील'

 
 
 
हाफ तिकीट’च डिजिटल पोस्टर रिव्हील

अलीकडच्या काळात छोट्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांचे भावविश्व रेखाटणाऱ्या सिनेमांची निर्मितीमराठीत प्रकर्षाने होताना दिसतेय. ‘हाफ तिकीट’ हा असाच एक वेगळा दृष्टीकोन देणारा सिनेमा निर्माते नानूभाई जयसिंघानी व दिग्दर्शक समित कक्कड घेऊन आले आहेत. या सिनेमाचं डिजिटल पोस्टर नुकतंच रिव्हील करण्यात आलं आहे. ‘हाफ तिकीट’ च्या निमित्ताने एक आशयघन विषय मांडला जाणार असल्याने व्हिडीओ पॅलेसचे नानूभाई जयसिंघानी यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा हाती घेतली आहे.

आपल्या कॅमेराच्या जादूने आपली वेगळी ओळख निर्माण करणारे प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे हे ‘हाफ तिकीट’चे छायाचित्रण करीत आहेत. या सिनेमाचे गीतलेखन क्षितीज पटवर्धन यांनी केले असून संगीताची जबाबदारी जी.वी.प्रकाश यांनी सांभाळली आहे. या दिग्गजांच्या नजरेतील ही कलाकृती नक्कीच वेगळी असेल यात शंका नाही. १५ जुलैला ‘हाफ तिकीट’ प्रदर्शित होणार आहे.