Sign In New user? Start here.
half ticket promotion fanda

"हाफ तिकीटचा प्रमोशन फंडा.!

 
 
 
"हाफ तिकीटचा प्रमोशन फंडा.!

चित्रपट आणि त्यांचं प्रमोशन हा सध्या खूप चर्चेचा विषय ठरतो आहे. बॉलिवूडमध्ये तर चित्रपटाच्या मार्केटिंग आणि प्रमोशनसाठी नानाप्रकार केले जातात. साऊथ इंडस्ट्रीमध्ये नुकतंच सुपरस्टार रजनीकांत याच्या आगामी 'कबाली' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्यांनी केलेलं एयर लाईनसोबतच प्रमोशन सध्या खूपच गाजतंय. अशातच मराठीतही एक स्टंट केला गेलाय. 22 जुलैला प्रदर्शित होणाऱ्या व्हिडीओ पॅलेस निर्मित 'हाफ तिकीट' या सिनेमानेही प्रमोशनसाठी एक वेगळाच फंडा केलाय.

वसाया फुड्स या कंपनीने हाफ तिकीट या नावाने तब्बल 10,00,000 वेफर्सच्या पाकिटांचं उत्पादन केलं आहे. हे वेफर्स संपूर्ण महाराष्ट्रात आज पासून मार्केट मध्ये उपलब्ध झाले आहेत. हाफ तिकीट या चित्रपटातील दोन लहान निरागस मुलं आणि या सिनेमाचं पोस्टर पाहून वसाया फुड्स या कंपनीने या वेफर्सच्या रॅपरवर देखील त्यांचा फोटो आणि लोगो वापरला आहे, जो नक्कीच आकर्षक वाटतो. निर्माता नानूभाई जयसिंघानी आणि दिग्दर्शक समिती कक्कड यांचा हाफ तिकीट या वेफर्सच्या माध्यमातून नक्कीच घराघरांत पोहचेल. हाफ तिकीट वेफर्स अशाप्रकारचं प्रमोशन नक्कीच वेगळं.