Sign In New user? Start here.
chourya film song

हाफ तिकीट’ प्रेक्षकांच्या भेटीला

 
 
 
हाफ तिकीट’ प्रेक्षकांच्या भेटीला

उष्टं पाष्टं बास, म्हणतो एक एक श्वास घास इज्ज्तीच्चा आपल्या, हातात पाहिजे

होऊ दे तरास, लांब कित्तीबी प्रवास, जिंदगीत माणसाच्या,रुबाब पाहिजे!

असं आत्मविश्वासाने म्हणणाऱ्या लहानग्यांच्या भावविश्वाचा अनोखा कॅनव्हास मांडणारा व्हिडीओ पॅलेस निर्मित व समित कक्कड दिग्दर्शित ‘हाफ तिकीट’ हा असाच एक वेगळा दृष्टीकोन देणारा सिनेमा २२ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आशय व सादरीकरणात अनेक यशस्वी प्रयोग करणारे दिग्दर्शक समित कक्कड ‘हाफ तिकीट’ च्या माध्यमातून दोन लहान मुलांच्या स्वप्नांचा अनोखा प्रवास घेऊन येणार आहेत.

आपल्याकडे नसलेली, पण हवीहवीशी वाटणारी गोष्ट मिळवण्याचा सुंदर प्रवास व त्यासाठी लागणार.. ‘हाफ तिकीट’! एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रत्येकजण धडपडतो, त्याची किंमत काहीही असो त्याच मूल्य आपल्यासाठी फार मोठं असतं ‘हाफ तिकीट’ हा सिनेमा अशाच दोन धडपडणाऱ्या भावंडांची ही कथा आहे. जगण्याचा संघर्ष व स्वप्नांचा पाठलाग करण्याचा ध्यास याचा मेळ साधत दोन लहानग्यांची धडपड ‘हाफ तिकीट’च्या माध्यमातून पहाता येणार आहे. लहान मुलांच भावविश्व, त्यांची भाषा, समज, जगण्याची पद्धत, या सगळ्यांचं थक्क करणारं दर्शन या सिनेमात असणार आहे.

माध्यमातून पहायला मिळणार आहे. कलाकारांच्या वेगळ्या भूमिका व गुलदस्त्यात असणारी एका सुप्रसिद्ध कलाकाराची एन्ट्री असं ‘फुल ऑन पॅकेज’ असणारा हा सिनेमा प्रेक्ष्कांसाठी जबरदस्त ट्रीटच असणार आहे. चल चल, रुबाब पाहिजे, भरले रे , लब्बाड घब्बाड अशी चार गाणी या चित्रपटात आहेत. शुभम मोरे व विनायक पोतदार या दोन बालकलाकारांसह भाऊ कदम, उषा नाईक, शशांक शेंडे, जयवंत वाडकर, प्रियांका बोस, कैलाश वाघमारे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.

आजवर अनेक यशस्वी चित्रपटांची निर्मिती व प्रस्तुती करणाऱ्या व्हिडीओ पॅलेसने ‘हाफ तिकीट’ च्या माध्यमातून समृद्ध आशयाचा हटके चित्रपट आणला आहे. चित्रपटाची कथा एम माणिकदान यांची असून लेखन ज्ञानेश झोटिंग याचं आहे. गीतलेखन क्षितीज पटवर्धन यांनी केले असून संगीताची जबाबदारी जी.वी प्रकाश यांनी सांभाळली आहे. छायाचित्रण संजय मेमाणे यांचं असून संकलन फैझल इम्रान यांचं आहे. साऊंड डिझाइन अनमोल भावे यांनी केलं असून कलादिग्दर्शन वासू पाटील यांचं आहे. कार्यकारी निर्माते मिलिंद शिंगटे, तन्मयी देव आहेत. लाईन प्रोड्यूसरची जबाबदारी आनंद गायकवाड, राहुल तुळसकर यांनी सांभाळली आहे.

जगण्याची प्रेरणा देणारा आशय, सुंदर कथा, अभिनयाने मोहून टाकणारे निरागस चेहरे आणि त्याला सुश्राव्य संगीताची जोड ह्या सगळ्याचा अविस्मरणीय अनुभव म्हणजे ‘हाफ तिकीट’.