Sign In New user? Start here.

हृतिक रोशनने जाहिर केली विक्रम फडणीसच्या हृदयांतर चित्रपटाची रिलीजची तारीख!

 
 

हृतिक रोशनने जाहिर केली विक्रम फडणीसच्या हृदयांतर चित्रपटाची रिलीजची तारीख!

विक्रम फडणीसच्या ‘हृदयांतर’ चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीत पहिलं पाऊल ठेवणा-या सुपरस्टार हृतिक रोशन ने ह्य़ा भावनिक मराठी सिनेमाच्या रिलीजची तारीख ट्विट केलीय.विक्रम फडणीस प्रॉडक्शन आणि यंग बेरी एन्टरटेन्मेट (प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगापुर्वेश सरनाईक) निर्मित, आणि विक्रम फडणीस दिग्दर्शित हृदयांतर चित्रपटामध्ये सोनाली खरे, मुक्ता बर्वे आणि सुबोध भावे ह्यांच्या मुख्य भूमिका आहेत.

'बॉलिवूडचा ग्रीक गॉड' म्हणून संबोधल्या जाणा-या हृतिकने सोशल नेटवर्किंग साइटवरून‘हृदयांतर’ चित्रपटाच्या रिलीजची तारीख 9 जून 2017 असल्याचं जाहिर केले. त्याने ट्विट करताना म्हटले, “ मी ज्या सिनेमाचा हिस्सा आहे. त्या सिनेमाच्या रिलीजची तारीख जाहिर करताना मला आनंद होतोय. ‘हृदयांतर’ ही फिल्म माझा मित्र विक्रम फडणीसने दिग्दर्शित केलेली आहे"निर्माता पुर्वेश सरनाईक, म्हणतो, "हृदयांतर चित्रपट, कुटुंब आणि नातेसंबंधांवर आधारित आहे. हा चित्रपट माझ्या हृदयाच्या अतिशय जवळचा आहे. हा चित्रपट बनवण्याची आणि पोस्ट प्रॉडक्शनची प्रक्रिया आम्ही सर्वांनीच खूप एन्जॉय केली. अनेक लोकं मला सांगतायत, की ते सध्या ह्या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत."

निर्माता आणि दिग्दर्शक विक्रम फडणीस म्हणतो, " मी सध्या खूप उत्साहित आहे. मी ह्या चित्रपटावर गेली तीन वर्ष काम करतोय. आणि आता शेवटी माझा हा चित्रपट 9 जूनला प्रेक्षकांपर्यंत पोहचणार आहे, त्यामूळे मला आनंद वाटतोय. मी एकाचवेळी आनंदात आणि टेन्शनमध्ये आहे. "विक्रम फडणीस प्रॉडक्शन आणि यंग बेरी एन्टरटेन्मेट (प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगापुर्वेश सरनाईक) निर्मित, आणि विक्रम फडणीस दिग्दर्शित हृदयांतर 9 जून 2017 ला चित्रपटगृहांमध्ये झळकणार आहे.

--------------------