Sign In New user? Start here.
jalsa new marathi movie

"स्मार्ट तरुणांचा स्मार्ट सिनेमा ''जलसा"

 
‘मुंबई पुणे मुंबई-2 सात दिवसात सात कोटीं
 
स्मार्ट तरुणांचा स्मार्ट सिनेमा ''जलसा"

आजच्या स्मार्ट युगात डिग्री पेक्षाहि अंगीभूत कौशल्याला अधिक महत्व प्राप्त झाले आहे . त्यामुळेच तरुणाई आपल्या आवडत्या क्षेत्रात जाताना अधिक दिसते. अशाच दोन स्मार्ट तरुणांचा "जलसा" हा स्मार्ट सिनेमा लवकरच येत आहे. नुकताच या सिनेमाचा मुहूर्त झाला.

चाकोरी बाहेरची कथा आणि भारत गणेशपुरे यांचा धम्माल विनोद प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे. मुंबई-पुण्याकडची लोकं लईच स्मार्ट असा सूर ग्रामीण भागातून ऐकायला मिळतोच. पुण्यातले दोन श्रीमंत उद्योगपतींची अमर आणि प्रेम हि दोन मुले स्वतःच्या उद्योगात करियर करण्यापेक्षा सिनेमा आणि नाटकात रमणारी आहेत. घरातून नाटकासाठीचा होणार विरोध आणि त्यातून मार्ग काढत अमर आणि प्रेमने त्यांच्या मांमाची घेतलेली मदत त्यातून निर्माण झालेली गोची प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी आहे. सिनेमातली भारत गणेशपुरेंची भूमिका हि पोट धरून हसायला लावणारीच आहे . अश्या धमाल किस्स्यांचा "जलसा " प्रेक्षकांसाठी खास ठरणारा आहे.

या सिनेमाचे निर्माते- दिग्दर्शक आशुतोष राज असून त्यांनी अभिराम भडकमकर यांच्या सोबत लेखनही केले आहे . अभिराम भडकमकर हे या सिनेमाचे क्रिएटिव दिग्दर्शक आहेत. हे या सिनेमाचे वैशिष्ट्य आहे. आशुतोष राज, निखिल वैरागर, सागर कारंडे, अभिजित चव्हाण, अरुण कदम, अंकुर वाढावे, गिरीजा जोशी, शीतल अहिरराव, सोनाली विनोद यांच्या प्रमुख भूमिका आहेत . रंगभूषाकार विनोद सरोदे यांनी खूप मेहनत घेतली आहे.