Sign In New user? Start here.
kayaa rascala new marathi movie of priyanka chopra

व्हेंटिलेटर नंतर प्रियांका चोप्राचा नवा चित्रपट ‘काय रे रास्कला..

 
 
 
"व्हेंटिलेटर नंतर प्रियांका चोप्राचा नवा चित्रपट ‘काय रे रास्कला..

धमाल कौटुंबिक विनोदी शैलीतून जोडले जाणारे भावबंध यांच चित्र व्हेंटिलेटर या चित्रपटातून रेखाटल्यानंतर... आता प्रेक्षकांना मनमुराद हसवण्यासाठी ‘काय रे रास्कला...’ म्हणत प्रियंका चोप्रा पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला. यावेळी निर्मात्या डॉ. मधु चोप्रा, चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीधरन स्वामी यांच्यासह चित्रपटातील कलाकारही उपस्थित होते. त्याशिवाय चित्रपट आणि टीव्ही मालिकांमधून अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या कुनिका सदानंदही यावेळी उपस्थित होत्या. ‘काय रे रास्कला’ या चित्रपटासाठी कार्यकारी निर्मातीची भूमिका कुनिका सदानंद साकारत आहेत.

आपली प्रत्येक कलाकृती ही तितकीच सक्षम असावी आणि आपल्या शुभेच्छा त्या प्रत्येक गोष्टीला मिळाव्या यासाठी प्रियंका नेहमीच आग्रही असल्याचं आपल्याला दिसतं. नुकत्याच पार पडलेल्या या मुहूर्तावेळी प्रियंका चोप्रा स्वत: उपस्थित राहू शकली नसली तरी विडीयोद्वारे तिने ‘काय रे रास्कला’ च्या संपूर्ण टीम ला शुभेच्छा दिल्या आहेत. तर हा चित्रपटही प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात यशस्वी होईल अशी आशा व्यक्त केली आहे.

<

पर्पल पेबल पिक्चर्स निर्मित ‘काय रे रास्कला’ चित्रपटाची निर्मिती प्रियंका चोप्रा आणि डॉ. मधु चोप्रा यांनी केली असून संगीता स्वामी आणि डॉ. सत्यशील बिरदार या चित्रपटाचे सह-निर्माते आहेत.

या चित्रपटाच्या चित्रिकरणास सुरूवात झाली असून नावातच दाक्षिणात्य तडका असलेला ‘काय रे रास्कला...’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शनासाठी सज्ज होणार आहे...