Sign In New user? Start here.

मान्यवरांच्या उपस्थितीत किरण कुलकर्णी V/S किरण कुलकर्णी चा प्रिमीअर'

kiran kulkarini vs kiran kulakrni film premier

मान्यवरांच्या उपस्थितीत किरण कुलकर्णी V/S किरण कुलकर्णी चा प्रिमीअर'

 
 
 
मान्यवरांच्या उपस्थितीत किरण कुलकर्णी V/S किरण कुलकर्णी चा प्रिमीअर

सिनेमागृहात प्रदर्शित झालेल्या किरण कुलकर्णी V/S किरण कुलकर्णी या सिनेमाचा प्रिमीअर नुकताच मुंबईत संपन्न झाला. मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर याप्रसंगी आवर्जून उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी चित्रपटातील कलाकारांचे आणि निर्माते-दिग्दर्शकांचे मनापासून कौतुक केले.

सध्या वाढलेल्या सायबर क्राईमचा धागा पकडून किरण कुलकर्णी V/S किरण कुलकर्णी चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे. हा कॉमेडी क्राइम सिनेमा आहे. क्रेडीट कार्डचा वापर करत कथेची नायिका कशाप्रकारे नायकाची फसवणूक करते. ही फसवणूक नेमकं कोणतं वळण घेणार? या वळणावर या दोघांमध्ये कोणते बंध निर्माण होणार? याची धमाल कथा म्हणजे किरण कुलकर्णी V/S किरण कुलकर्णी. धावपळीचं आयुष्य जगताना छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद घ्यायला आपण विसरून गेलो आहोत हा आनंद प्रत्येकाने आवर्जून घ्यायला हवा हे सांगतानाच जगण्याच्या दृष्टीकोनावरही हा सिनेमा भाष्य करतो.

कांचन अधिकारी व ओम गहलोट निर्मित व पियुष गुप्ता सहनिर्मित या चित्रपटात सुबोध भावे, क्रांती रेडकर, मोहन जोशी, अविष्कार दारव्हेकर, प्रिया मराठे, नम्रता आवटे, माधवी गोगटे, धनंजय मांजरेकर, अमित कल्याणकर व बालकलाकार उर्मिका गोडबोले यांच्या भूमिका आहेत.