Sign In New user? Start here.
lal ishq padwa celebration

"'लाल इश्क़' चित्रपट टीमचे पाडवा सेलिब्रेशन

 
 
 
''लाल इश्क़' चित्रपट टीमचे पाडवा सेलिब्रेशन

मराठी सिनेमांतील आशयसमृद्ध विषय आणि बांधणीमुळे अनेक दिग्गजांना मराठी चित्रपटसृष्टीची भुरळ पडत आहे. दर्जेदार कथानकावर आधारित चित्रपटांचे प्रेक्षकांकडून स्वागत होत असल्यामुळे अनेक हिंदी निर्माते मराठी सिनेमात गुंतवणूक करू पाहत आहेत. बॉलीवूडमधील भव्य दिव्य चित्रपट करणारे दिग्दर्शक म्हणून प्रचलित असलेले दिग्दर्शक संजय लीला भन्साळी ही मराठी सिनेसृष्टीपासून दूर राहू शकले नाहीत. मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यास इच्छुक असणा-या संजय लीला भन्साळींनी आपली हि इच्छा 'लाल इश्क' चित्रपटाच्या माध्यमातून पूर्ण केली आहे.

स्वप्ना जोशी-वाघमारे दिग्दर्शित 'लाल इश्क…गुपित आहे साक्षीला' या सिनेमात स्वप्नील जोशी आणि अंजना सुखानी हि दोन कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. नुकताच या सिनेमातल्या कलाकारांनी पारंपारिक वेशभूषेत जुहुच्या भन्साळी प्रोडक्शन मध्ये गुढीपाडवा साजरा केला.

शिरीष लाटकर लिखित हा सिनेमा भन्साळी प्रॉडक्शनची निर्मिती असून शबिना खान हया सिनेमाच्या सहनिर्मात्या आहेत. लाल इश्क़ हा मराठी सिनेमांमधला सर्वात उत्सुकता वाढवणारा चित्रपट आहे. येत्या २७ मे रोजी 'लाल इश्क़'च गुपित जगजाहीर होणार आहे,