Sign In New user? Start here.

‘गमावण्याचा आणि गवसण्याचा’ प्रवास ‘लॉस्ट अँड फाऊंड'

yz giri

‘गमावण्याचा आणि गवसण्याचा’ प्रवास ‘लॉस्ट अँड फाऊंड'

 
 
 
‘गमावण्याचा आणि गवसण्याचा’ प्रवास ‘लॉस्ट अँड फाऊंड'

‘लॉस्ट अँड फाऊंड’ ह्या मराठी चित्रपटाच्या इंग्रजी नावावरूनच, ह्या चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकतानिर्माण होते आहे. दिवसेंदिवस शहरांचा झपाट्याने विकास होत आहे. वाढत्या शहरीकरणाबरोबर माणसांची गर्दीदेखील वाढत आहे आणि ह्या माणसांच्या गर्दीतली माणसं मात्र गर्दीत एकाकी आहेत ! हा विरोधाभास जरी वाटतअसला, तरी हेच सत्य आहे. जागतिक पातळीवर, 'depression rate', भारतात सर्वाधिक असून अगदी फेसबुक,व्हॉट्स अपच्या, 'व्हर्चुअल गर्दीत' सुद्धा माणूस एकटा पडलाय ! एकाकी पडलेल्या व्यक्तीला फक्त हवं असतं,त्याचं हे 'एकटेपण', ऐकून घेणारा आणि 'हो मी समजू शकतो' म्हणणारा कोणी एक !चित्रपटातील, सिद्धार्थ चांदेकर आणि स्पृहा जोशी ह्यांच्या एकाकीपणातूनच त्यांची प्रेमकथा सुरू होते का ? त्यांनी आपापल्या आयुष्यात काहीतरी गमावलाय का ? जे गमावलंय ते त्यांना गवसतं का ? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला २९जुलैला प्रदर्शित होणाऱ्या 'लॉस्ट अँड फाऊंड ' ह्या अत्यंत हटके आगामी चित्रपटात मिळतील.

निर्माते विनोद मलगेवार ह्यांनी ह्या 'हटके' चित्रपटाची निर्मिती केली असून ‘गमावण्याचा आणिगवसण्याचा’ प्रवास लेखक ऋतुराज धालगडे ह्यांनी चित्रपटाच्या कथेत इतका सुंदरपणे मांडला आहे की प्रत्येकजणच ह्या चित्रपटाशी समरस होईल! शिवाय कथे बरोबर पटकथा आणि संवाद देखील धालगडे ह्यांनी लिहिलेअसून चित्रपटाचं दिग्दर्शनही त्यांनी केलं आहे. त्यांच्या ह्या कथेला योग्य तो न्याय देण्यासाठी सिध्दार्थ चांदेकर,स्पृहा जोशी, मंगेश देसाई आणि डॉ मोहन आगाशे ह्या कलाकारांबरोबर अजूनही काही दिग्गज कलाकारआपल्याला ह्या चित्रपटाच्या कथानकात भेटतील. विशेष म्हणजे अभिनेत्री स्पृहा जोशी आणि डॉ राहुल देशपांडेह्यांनी ह्या चित्रपटाची श्रवणीय गाणी लिहिली असून शुभांकर ह्यांनी लयबद्ध संगीत दिलं आहे. चित्रपटाचं सुंदर छायाचित्रीकरण रमेश भोसले ह्यांनी केलं आहे आणि संकलनाची जबाबदारी जितेंद्र डोंगरे ह्यांनी पार पाडली आहे .

अत्यंत उत्सुकता निर्माण करणारा असा हा चित्रपट असून चित्रपटांप्रमाणेच आपल्यालाही आपल्या प्रत्यक्षआयुष्यात गमावलेलं, गवसता येईल पण त्यासाठी मात्र वाट पहावी लागेल २९ जुलैची !