Sign In New user? Start here.

बिग बी आणि सलमान खानकडून 'ध्यानीमनी'ला शुभेच्छा

 
 

बिग बी आणि सलमान खानकडून 'ध्यानीमनी'ला शुभेच्छा

सध्या मराठी चित्रपटांवर बॉलिवूडचं विशेष लक्ष आहे. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रेटी मराठी चित्रपटांचं भरभरून कौतुक करत आहे. बिग बी आणि सलमान खाननं 'ध्यानीमनी'या चित्रपटाच्या ट्रेलरला दाद दिली असून, ट्विटरवरून आणि फेसबुकवरून चित्रपटाला शुभेच्छाही दिल्या आहेत. तसंच ट्रेलरही ट्विट केला आहे. दोनच दिवसांत चित्रपटाच्या ट्रेलरला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. सोशल मीडियात या चित्रपटाविषयी जोरदार चर्चा सुरू आहे.

महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर आणि अनिरुद्ध देशपांडे यांच्या ग्रेट मराठा एंटरटेन्मेंटनं चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसेच स्मिता ठाकरे, अमोलख सिंग गाखल, इक्बालसिंग गाखल आणि राजेश बंगा सहनिर्माते आहेत. आशयसंपन्न नाटकं आणि अनेक चित्रपटांचं दिग्दर्शन केलेल्या चंद्रकांत कुलकर्णी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. नाटककार प्रशांत दळवी यांनीच चित्रपटाचं लेखन केलं आहे. संदीप खरे यांनी गीतलेखन आणि अजित परब यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात महेश मांजरेकर, अश्विनी भावे, मृण्मयी देशपांडे आणि अभिजित खांडकेकर यांच्या भूमिका आहेत.

महेश मांजरेकरांनी २०१६ सालाची दमदार सुरूवात "नटसम्राट " ने केली होती आणि आता, २०१७ च्या सुरूवातीला येत असलेल्या "ध्यानीमनी " या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांबरोबरच चित्रपटसृष्टी मध्येही जबरदस्त उत्सुकता आहे. 'ध्यानीमनी' चा एक अत्यंत वेगळा विषय कशा पद्धतीनं साकारण्यात आला आहे, याचीच प्रेक्षकांना उत्सुकता आहे. १० फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

--------------------