Sign In New user? Start here.

"संगीत दिग्दर्शक प्रवीण कुवर यांच्या संगीताची जादू पुन्हा एकदा अनुभवता येणार"

music director pravin kuvar music

संगीत दिग्दर्शक प्रवीण कुवर यांच्या संगीताची जादू पुन्हा एकदा अनुभवता येणार

 
 
 
 
 
"संगीत दिग्दर्शक प्रवीण कुवर यांच्या संगीताची जादू पुन्हा एकदा अनुभवता येणार"

प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक प्रवीण कुवर यांच्या संगीताची जादू पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. आजवर त्यांनी विविध गाण्यांवर श्रोत्यांना नाचायला लावलं आहे. मराठी बरोबरच प्रवीण यांनी हिंदी आणि इतर भाषांमध्येही उत्तम गाणी तयार केली आहेत.पोलीस लाईन , बुगडी माझी सांडली ग , भुताचा हनिमून, प्रेम कहानी , धमक अशा बऱ्याच चित्रपटांमधली त्यांची गाणी गाजली आहेत . याचबरोबर या कोळी वाड्याची शान आणि बानूबया या गाण्यांनी तर लोकांना वेड लावल आहे.

आता पुन्हा एकदा ओढ या चित्रपटाद्वारे त्यांच्या संगीतातील वेगळेपण आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात स्वप्नील बांदोडकर आणि नेहा राजपाल (निरंतर राहू दे हृदयात तू ) हे गणपतीचं गाणं गाणार आहेत आणि रोहित राऊत आणि आनंदी जोशी (लागली तुझी ओढ) हे यांचं एक प्रेमगीत आहे. यातील गाणी संजाली रोडे आणि अभय इनामदार यांनी शब्दबद्ध केली आहेत.

स्वप्नील बांदोडकर म्हणतात कि प्रवीण साठी गाण्याचा अनुभव नेहमीच उत्साहपूर्ण असतो. गाण्यामध्ये नवनवीन प्रयोग करण्यासाठी ते नेहमीच आग्रही असतात. नेहा म्हणते कि हे गणपती बाप्पा च गाणं आहे त्यामुळे हे गाणं गाताना मला बाप्पाचा आशिर्वाद मिळाल्यासारखं वाटलं तर रोहित आणि आनंदी म्हणतात कि हे प्रेमगीत गाताना आम्ही खूप धमाल केली. हे गाणं गाण्याचा अनुभव खूप छान होता. आणि या प्रोसेस मध्ये आम्ही खूप वेगळेपण जपण्याचा प्रयत्न केला आहे . या चित्रपटाचे निर्माते एस. आर. तोवर आहेत आणि दिग्दर्शक दिनेश ठाकूर आहेत. भाऊ कदम , उल्का गुप्ता आणि मोहन जोशी हे कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.