Sign In New user? Start here.

"नटसम्राट आज होणार पुन:प्रदर्शित

kajal and faijal love story

"काजल व फैजलची अनोखी प्रेमकहानी

 
‘मुंबई पुणे मुंबई-2 सात दिवसात सात कोटीं
 
"नटसम्राट आज होणार पुन:प्रदर्शित

पायरेटॆड कॉपी चित्रपट सृष्टीला नवीन नाही. या पायरेटेड कॉपीचा फटका नटसम्राट चित्रपटालाही बसला यावर मार्ग म्हणून हा चित्रपट पुन:प्रदर्शित करण्यात येणार आहे.अभिनेता नाना पाटेकर आणि विक्रम गोखले यांच्या अभिनयाने सजलेला ‘नटसम्राट’ चित्रपट नव्या दृश्यांसह उद्या प्रदर्शित होत आहे. या आधी असा प्रकार हिंदी चित्रपट केला गेला आहे. मराठीत चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर नवीन दृश्य समाविष्ट करण्याचा मराठीतला हा बहुदा पहिलाच प्रकार आहे.

चित्रपटाच्या मध्यांतरानंतर नाना आणि विक्रम गोखले यांच्यातील संवाद असलेला सात मिनिटांचा सीन नव्या सिनेमात समाविष्ट करण्यात आला आहे. आधीच्या चित्रपटात या सीनला कात्री लावण्यात आली होती. पण हा सीन पुन्हा समाविष्ट करण्याचा निर्णय ‘नटसम्राट’ टीमने घेतला आहे.

वेळेच्या बंधनामुळं चित्रपटातून वगळण्यात आलेले नाना आणि विक्रम गोखले यांच्यामधला ह्दयस्पर्शी प्रसंग पुन्हा समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, उद्यापासून प्रेक्षक हा प्रसंग पाहू शकतील. चित्रपटात विक्रम गोखले आणि नाना पाटेकर या दोन दिग्गजांच्या अभिनयाच्या जुगलबंदीचं सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. प्रेक्षकांच्या मनावर आणि बॉक्स ऑफिसवर अधिराज्य गाजवणारा ‘नटसम्राट’चित्रपट नव्या दृश्यांसह उद्या प्रदर्शित होत आहे.

--------------------