Sign In New user? Start here.
pindadan a love story

अनोखी प्रेमकथा 'पिंडदान' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!!

 
 
 
अनोखी प्रेमकथा 'पिंडदान' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!!

फॅशन फोटोग्राफीमध्ये 'बंटी प्रशांत' या नावाला विशेष ग्लॅमर आहे. गेल्या १५ वर्षांत फॅशन वर्ल्डमध्ये वावरल्यानंतर ही जोडी आता मराठी चित्रपटसृष्टीत दाखल झाली आहे. आगामी पिंडदान या चित्रपटाद्वारे ते मराठी चित्रपटात पदार्पण करत आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रशांत पाटील यांनी केलं असून, बंटी देशपांडे यांनी छायाचित्रण केलं आहे.

उदय पिक्चर्स, अश्तिका इरा एलएलपी यांची निर्मिती असलेला पिंडदान सारथी एंटरटेन्मेंटच्या पूनम शेंडे प्रस्तुत करत आहेत. बंटी प्रशांत यांच्या फॅशन स्टुडिओतून अनेक मॉडेल घडल्या. त्यातील काहींनी अभिनय क्षेत्रातही नाव कमावलं. अभिनेत्री प्राची देसाई, तेजस्विनी पंडित, अभिनेता भूषण प्रधान ही त्यापैकीच काही नावं. अनेक वर्षं फॅशन इंडस्ट्रीत वावरल्यानंतर या दोघांनी 'पिंडदान' हा चित्रपट केला आहे. त्यांच्या जाहिरात आणि फॅशन क्षेत्रातील अनुभवातून साकारलेल्या 'पिंडदान'मध्ये उत्तम कथानक आणि उत्तम कलाकार दिसणार आहेत. पुणे आणि मुंबई या दोन्ही शहरांत 'बंटी प्रशांत' यांच्या नावाची ख्याती आहे.

बंटी देशपांडे हे १९९१पासून फॅशन फोटोग्राफी आणि छायाचित्रण करत आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक शॉर्टफिल्म, जाहिराती चित्रीत केल्या आहेत. प्रख्यात छायालेखक महेश अणे आणि बॉबी सिंग यांच्याकडे सहायक म्हणूनही काम केलं आहे. तर, प्रशांत पाटील यांनी पहिला चित्रपट करण्यापूर्वी अनेक जाहिराती, व्हिडिओ अल्बम्स दिग्दर्शित केल्या आहेत. गेली २० वर्षांहून ते मॉडेल आणि अभिनय प्रशिक्षण देतात. नागपूरमध्ये असताना त्यांनी आताचे आघाडीचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्यासह मराठी आणि हिंदी नाटकांतून काम केलं होतं. जयदेव हट्टगंडी यांची नाट्यकार्यशाळाही केली होती. एफटीआयआयमधून अभ्यासक्रमही केला होता. व्ही. शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओसह ते दीर्घकाळ कार्यरत होते. त्यामुळे मोठा अनुभव गाठीशी आल्यावर 'पिंडदान'च्या माध्यमातून ते दिग्दर्शकीय कारकिर्दीचा प्रारंभ करत आहेत.