Sign In New user? Start here.

बहारदार लावणीने नटलेला "पिंजरा" चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात

jalsa new marathi movie

"बहारदार लावणीने नटलेला "पिंजरा" चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात ''जलसा"

 
‘मुंबई पुणे मुंबई-2 सात दिवसात सात कोटीं
 
बहारदार लावणीने नटलेला "पिंजरा" चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात.

व्ही शांताराम यांची निर्मिती श्रीराम लागू आणि संध्या यांचा अभिनय आणि अनेक बहारदार लावणी नृत्य आणि गिताने नटलेला पिंजरा चित्रपट. हा चित्रपट १८ मार्च रोजी पुन्हा एकदा चित्रपट गृहात डॉल्बी साउंड सिस्टीम या नवीन तंत्रामध्ये झळकणार आहे. निर्माता-दिग्दर्शक-संकलक व्ही. शांताराम यांचा ‘पिंजरा’ हा मराठीतील पहिला रंगीत चित्रपट आहे. १९७२ सालातल्या ३१ मार्च रोजी तो सर्वप्रथम झळकला तेव्हा प्लाझा हे त्याचे प्रमुख चित्रपटगृह होते. आतादेखिल प्लाझा येथेच हा चित्रपट झळकेल.

या चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत बोलताना डॉ श्रीराम लागू म्हणाले की व्ही. शांताराम यांच्यासारख्या ताकदीच्या व्यक्तीसोबत मला चित्रपटातले पहिले काम करण्याचा योग आला . त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कामाचा प्रभाव इतका विलक्षण होता की मी भारावून गेलो आणि मी चक्क त्यांच्या पायांवर डोके ठेवले. आजपर्यंत असे फार कमी लोक माझ्या आयुष्यात आले आहेत ज्यांना मी वंदन केलं आहे. मी अभिनेता असल्यामुळे चित्रपटात काम मिळावे ही अपेक्षा होती. पण बापूंनी पहिल्याच वाक्यात माझी विकेट घेतली. पण त्या गप्पांमुळे माझ्यातला नट जागा झाला. मी अत्यंत नवखा पण त्यांचा माझ्यावर असलेला विश्वास पाहून मी भारावून गेलो.

मी मराठी चित्रपटात काम करत नव्हतो तेव्हा मराठी चित्रपटांबद्दल माझं मत चांगले नव्हते. पण बांपूसारखी माणसे आहेत तोपर्यंत मराठी चित्रपट टिकून राहतील असा विश्वास मला आहे. चित्रपटाच नाव पिंजरा’ हे ही मला सुरवातीला आवडल नव्हते पण जस जसे चित्रीकरण होत गेले तसा माझा विचार किती मूर्खपणाचा होता हे मला समजत गेलं. सुरवातीला आम्ही कलाकार जनावरे आहोत का, पिंज-यात काम करायला असे मी विचारत होतो पण नंतर समजले लोखंडाचा किंवा लाकडाचा पिंजरा नसून माणसाच्या जाणिवांचा आहे. ट्रेलर.