Sign In New user? Start here.
poshter girl rupali

"पोश्टर गर्लचे स्वयंवर येत्या 12 फेब्रुवारीला

 
‘मुंबई पुणे मुंबई-2 सात दिवसात सात कोटीं
 
"पोश्टर गर्लचे स्वयंवर येत्या 12 फेब्रुवारीला

पारगाव टेकवडे…एक विचित्र आणि विक्षिप्त गाव... अशा या गावात आलीये एक ‘फटाकडी’…पारगाव टेकवडेत या ‘पोश्टर गर्ल’ने एन्ट्री घेतली आणि काकांची पंचाईत झाली...घराण्यात एकुलतं एक कन्यारत्न हे ऐकीवात होते पण अख्या गावात एकूलती एक ही वायकॉम18 मोशन पिक्चर्सची ‘पोश्टर गर्ल’...या गावात सगळेचं बोहल्यावर चढायला एका पायावर तयार...पण पोश्टर गर्लला साजेसा ‘वर’ कसा शोधायचा यासाठी काकांनी आपल्या पोश्टर गर्लचं स्वयंवर करायचा निर्णय घेतला…आणि गावातल्या तरूणांची भली मोठी लिस्ट शॉर्टलिस्ट करायला घेतली.... पोश्टर गर्लची जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलणारं हे जबाबदार व्यक्तीमत्त्व आहे ऋषिकेश जोशी...

या भल्या-मोठ्या लिस्टमधून शॉर्टलिस्ट झालेले पहिले उमेदवारम्हणजेच आहेत भारतराव झेंडे...हा सेल्फीदिवाणा तरूण जितेंद्र जोशी यांनी साकारला आहे. बजरंग दुधभाते येऊन धडकला आहे...या पोश्टर गर्लला...ही भूमिका साकारली आहे अनिकेत विश्वासराव ने.... अर्जुन कलाल ही व्यक्तीरेखा साकारणारा सिध्दार्थ मेनन एका बाजूला जितेंद्र जोशी तर दुसऱ्या बाजूला अनिकेत विश्वासराव अशा दोन जिगरबाज अभिनेत्यांबरोबर सिध्दार्थ ही पोश्टर गर्लच्या मागावर आहे. सिध्दार्थचा सोनालीसोबतचा रोमान्स पाहून मराठी सिनेसृष्टीला नवा चॉकलेट बॉय मिळाला हे म्हणायला हरकत नाही. तर या यादीतले शेवटचे उमेदवार आहेत...रमेश-सुरेश! रमेश च्या भूमिकेत अक्षय टंकसाळे आपल्याला दिसणार आहे, तर अनेक नाटक, सिनेमातून आपल्या चेहऱ्याची कळी खुलवणारे संदीप पाठक यांनी सुरेशची भूमिका साकारली आहे.

वायकॉम18 मोशन पिक्चर्स चे निर्माते अजित अंधारे यांच्यासाठी पोश्टर गर्ल हे मराठीत टाकलेले खूप महत्त्वाचे पाऊलं आहे तर हादी अली अब्रार आणि पुष्पांक गावडे यांची निर्मिती संस्था पोश्टर गर्लच्या निमित्ताने निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. या चित्रपटासाठी क्षितीज पटवर्धन यांनी लिहिलेल्या गीतांना अमितराज यांनी संगीत दिले आहे. अमितराजने या चित्रपटाच्या निमित्ताने आपल्याला तीन सुंदर गाण्यांची मेजवानी दिली आहे.चित्रपटाची कथा, पटकथा हेमंत ढोमे यांनी लिहिली आहे. तर या चित्रपटात त्यांनी अभिनय ही केला आहे. याशिवाय सिनेसृष्टीतले दिग्गज या चित्रपटाचा भाग आहेत.

आता या पाच जणांपैकी पोश्टर गर्ल नक्की कोणाच्या गळ्यात माळ घालते, हे कळेल येत्या 12 फेब्रुवारीला तुमच्या नजीकच्या चित्रपटगृहात...