Sign In New user? Start here.

अजय-अतुलचं यांनी सैराट मधील सर्वच गाणी केली हॉलीवूडमध्ये रेकॉर्ड

अजय-अतुलचं यांनी सैराट मधील सर्वच गाणी केली हॉलीवूडमध्ये रेकॉर्ड

 
 
 
अजय-अतुलचं यांनी सैराट मधील सर्वच गाणी केली हॉलीवूडमध्ये रेकॉर्ड

अजय-अतुल नाव घेताच डॊळ्यासमोर येतात सध्याच्या काळातील मराठीतील गाजलेली गाणी. या दोघांनी मराठी संगीताला नवसंजिवनी मिळवून दिली आहे. सध्या सैराट या चित्रपटतील गाजत असलेलं गांण येड लागल आणि झिंगाट गाण्यांची एकप्रकारे प्रेक्षकांना झींगच चढली आहे.

या गाण्यांची खासियत म्हणजे ही गाणी हॅालिवूडमधील 'सोनी स्टूडियोज' मध्ये 'सिंफनी ओर्केस्ट्रा'सोबत ध्वनिमुद्रीत करण्यात आली आहेत. अजय-अतुल यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 66 परदेशी म्युझिशियन्सनी ‘सैराट’साठी मेहनत घेतली आहे.

लॉस एंजिलिस येथील सोनी एमजीएम हा जगप्रसिद्ध स्टुडिओ आहे. हा जगातील सर्वात अत्याधुनिक साऊंड स्टुडिओ मानला जातो. या स्टुडिओमध्ये गाण्याचं रेकॉर्डिंग करणारा नागराज मंजुळे यांचा ‘सैराट’ हा पहिला भारतीय चित्रपट असल्याचं म्हंटल जात आहे.

व्हिडीऒ- सौजन्य झी स्टुडीऒज

 
Sairat | Sony Studios | Hollywood | Ajay - Atul | Behind The S...

स्वप्न ३० वर्षांपासूनचं, प्रवास ३० तासांचा...रचला गेलाय इतिहास मराठी चित्रसृष्टीचा.'सैराट' ठरलाय हॅालिवूडमधील 'सोनी स्टूडियोज' मध्ये 'सिंफनी ओर्केस्ट्रा'सोबत ध्वनिमुद्रण करणारा पहिला भारतीय चित्रपट.सुवर्णाक्षरांत लिहील्या गेलेल्या ह्या इतिहासाचे सोनेरी क्षण, खास तुमच्यासाठी..This summer #GoSairat! #Sairat

Posted by Zee Studios on Tuesday, March 29, 2016