Sign In New user? Start here.

"सैराट" च्या चक्रव्यूहातून "लाल इश्क" दाखवणार का आपली कमाल?’

sairat Vs lal ishq

सैराट" च्या चक्रव्यूहातून "लाल इश्क" दाखवणार का आपली कमाल’

 
 
 
"सैराट" च्या चक्रव्यूहातून "लाल इश्क" दाखवणार का आपली कमाल?’

मराठी चित्रपट म्हंटल की सध्या सर्वांच्या डॊळ्यासमोर सैराटच येतोय. या चित्रपटाची सध्या एवढी क्रेझ आहे की नविन मराठी चित्रपट रिलीज करतानाही मराठी दिग्दर्शकांना विचार करावा लागत आहे. सैराटला जबरदस्त मिळत असलेल्या प्रतिसादामुळे ६ मे रोजी त्यानंतर १३ मे रोजी एकही मराठी चित्रपट प्रदर्शित झाला नाही. २० मेला पैसा पैसा झळकला खरा मात्र सैराटपुढे या चित्रपटाचे काही चालले नाही.

या आठवड्यात २७ मेला संजय लीला भन्साळी यांचा लाल इश्क हा सिनेमा प्रदर्शित होतोय. सैराटमय झालेले प्रेक्षक या सिनेमाला कसा प्रतिसाद देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सैराट ने मराठी चित्रपटसृष्टीत नवनवे विक्रम प्रस्थापित केलेत. सैराटची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरु असताना इतर मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनावर मोठा परिणाम पाहायला मिळतोय. सैराटमुळे अनेक मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकल्या गेल्या. २९ एप्रिल रोजी सैराट चित्रपटगृहामध्ये रिलीज करण्यात आला. लोकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतल आहे.