Sign In New user? Start here.

सैराट मधील झिंगाट गाणं रिलीज

krishnaji ek yodha film muhurat

सैराट मधील झिंगाट गाणं रिलीज

 
 
 
सैराट मधील झिंगाट गाणं रिलीज

 
 

काल झी मराठी वरील अवार्ड मध्ये अजय-अतुल यांनी नागराज मंजुळे यांच्या सैराट चित्रपटातील ’झिंगाट’ गाणं सादर केलं. तेव्हापासून या गाण्याची वेगळीच झिंग आता प्रेक्षकांना चढली आहे. आधी आगामी ‘सैराट’ चित्रपटातील गाण्यांनी आधीच सोशल मिडियात धूमाकूळ घातला आहे. ग्रामीण शब्दांचा लय भारी वापर आणि अजय-अतुल यांच्या आवाजाचा तडका असलेलं हे गाणं प्रेक्षकांच्या मनात नक्की घर करेल यात शंका नाही.

‘झालंय झिंग झिंग झिंगाट’ असे या गाण्याचे बोल असून या गाण्याचा व्हिडिओ नागराज मंजुळे याने त्याच्या फेसबुक प्रोफाईलवर शेअर केलाय. या व्हिडिओत सिनेमातील काही खास व्हिज्युअल्स दाखवण्यात आले असून सोबतच या धमाकेदार गाण्याचे बोलही देण्यात आले आहेत. या गाण्यातून अजय-अतुल यांची खास शैलीही बघायला मिळते.