Sign In New user? Start here.

‘तालीम’चा संगीतप्रकाशन सोहळा संपन्न

yz giri

‘तालीम’चा संगीतप्रकाशन सोहळा संपन्न

 
 
 
‘तालीम’चा संगीतप्रकाशन सोहळा संपन्न

एके काळी मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारा महाराष्ट्राच्या लाल मातीतील खेळ असलेली कुस्ती लवकरच मराठी चित्रपटात दिसणार आहे. बऱ्याच बॉलिवूडपटांचे यशस्वी संकलन केल्यानंतर थेट मराठीत दिग्दर्शनाकडे वळलेल्या नितीन मधुकर रोकडे यांच्या ‘तालीम’ या आगामी मराठी चित्रपटात प्रेक्षकांना पुन्हा एकदा कुस्तीचे डावपेच पाहायला मिळणार आहेत. रघुजन फिल्म्स, रोअरिंग गोट मीडिया आणि एनएमआर मूव्हीज या बेनरअंतर्गत निर्माते सुदर्शन लक्ष्मण इंगळे, संजय मुळे, जयआदित्य गिरी आणि नितीन मधुकर रोकडे ‘तालीम’ चित्रपटाची निर्मिती करीत असून येत्या 15 जुलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

रघुजन फिल्म्स, रोअरिंग गोट मीडिया आणि एनएमआर मूव्हीज या बेनरअंतर्गत निर्माते सुदर्शन लक्ष्मण इंगळे, संजय मुळे, जयआदित्य गिरी आणि नितीन मधुकर रोकडे यांची निर्मिती असलेल्या ‘तालीम’ या संगीतप्रधान चित्रपटाचा संगीतप्रकाशन सोहळा नुकताच ऑर्किड हॉटेल येथे बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक डेव्हिड धवन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते सुदर्शन इंगळे, संजय मुळे, जयआदित्य गिरी, दिग्दर्शक नितीन मधुकर रोकडे, कलाकार अभिजीत श्वेतचंद्र, वैशाली दाभाडे, विष्णू जोशीलकर, प्रशांत मोहिते, गीतकार मंदार चोळकर, संगीतकार प्रफुल्ल कार्लेकर, केमेरामन फारूख खान, गायिका आनंदी जोशी, तरन्नुम मलिक, रोंकणी गुप्ता, गायक स्वप्निल गोडबोले, अभिरूप तसेच बॉलिवूड तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील काही मान्यवर मंडळी उपस्थित होती.

‘तालीम’मध्ये एकूण 5 गीतांचा समावेश असून सध्याचा आघाडीचा गीतकार मंदार चोळकर याने ही गीते लिहिली असून संगीतकार प्रफुल्ल कार्लेकर यांनी या गीतांना संगीत दिले आहे. ‘‘तालीम रंगू दे...’’ हे शीर्षक गीत आदर्श शिंदे आणि तरन्नुम मलिक यांनी गायलं आहे. ‘‘इश्काचा बाण सुटला...’’ ही धडाकेबाज लावणी रोंकणी गुप्ता आणि स्वप्निल गोडबोले यांच्या आवाजात ध्वनीमुद्रित करण्यात आली आहे. ‘कळा ना यो कळा ना ...’’ हे विरहगीत दिव्यकुमार आणि कल्पना पोटवरी यांनी तर ‘‘रंगात रंग वेगळा...’’ हे प्रेमगीत आनंदी जोशी आणि फरहाद भिवंडीवाला यांनी गायलं आहे. ‘‘बे एके बे...’’ हे धम्माल गीत या चित्रपटात दोनदा दिसणार असून अनुक्रमे अभिरूप तसेच स्वप्निल गोडबोले यांनी हे गाणे गायलं आहे. मंदार चोळकरच्या लेखणीतून आकाराला आलेल्या या गीतांना संगीतकार प्रफुल्ल कार्लेकर याने अप्रतिम स्वरसाज चढवला आहे.