Sign In New user? Start here.

'TTMM’ चित्रपटाचा मुहूर्त.

ttmm film muhurat

"'TTMM’ चित्रपटाचा मुहूर्त"

 
 
 
'TTMM’ चित्रपटाचा मुहूर्त.

मराठी चित्रपटात नाविन्यपूर्ण व चांगल्या विषयाची निवड जाणीवपूर्वक निर्माते व दिग्दर्शक करू लागले आहेत. मराठी प्रेक्षक वेगळ्या विषयांकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होतो. ही बाब लक्षात घेवून संस्कृती सिनेव्हिजनतर्फे 'TTMM’ या आगळ्या विषयावरच्या चित्रपटाची प्रस्तुती करण्यात आली आहे. संदेश म्हात्रे निर्मित, गिरीश मोहिते दिग्दर्शित 'TTMM’ चित्रपटाचा मुहूर्त एका प्रेमगीताच्या चित्रीकरणाने नुकताच संपन्न झाला.

काळची पावलं ओळखत त्याचा नेमका वेध कलाकृतीच्या माध्यमातून घेणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये गिरीश मोहिते यांचं नावं आवर्जून घ्यावं लागेल. आपल्या आगामी ‘TTMM’ या चित्रपटातूनही प्रेमाच्या नव्या कल्पना, नात्यांची नवी परिमाणं मानवी संबंधातील नवीन प्रवाह, याविषयीचा वेध घेतला आहे. या सिनेमात रसिकांना दमदार कथानकासोबतच अभिनेता सुबोध भावे व अभिनेत्री दीप्ती देवी ही फ्रेश जोडी रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे. आजच्या काळचं प्रतिबिंब दाखवणारा हा सिनेमा निश्चितच वेगळा असल्याची भावना सुबोध भावे व दीप्ती देवी यांनी यावेळी बोलून दाखवली.

सचिन भोसले चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाचं लेखन संजय पवार याचं आहे. छायांकन कृष्णा सोरेन यांचं आहे. संगीत अविनाश-विश्वजीत यांचं आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत सुबोध भावे, दीप्ती देवी यांच्या अतुल परचुरे ही आहेत. 'TTMM’ चे यापुढील चित्रीकरण पुण्यात होणार आहे. वेगळा विषय व नवी जोडी यामुळे या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे.