Sign In New user? Start here.
vaibhav pooja love express

वैभव पूजाची LOVE एक्सप्रेस'

 
 
 
वैभव पूजाची LOVE एक्सप्रेस

रुपेरी पडद्यावर तरुण पिढीला अपील होतील अशा चित्रपटांची निर्मिती सातत्याने होऊ लागली आहे. ‘अथर्व ४ यु मिडिया अॅण्ड एन्टरटेन्मेंट प्रा.लि’ ही चित्रपट निर्मिती संस्था ‘LOVE एक्सप्रेस’ हा प्रेमपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे. नुकत्याच एका शानदार सोहळ्यात या चित्रपटाची घोषणा करण्यात आली.

प्रेमकथा नेहमीच सिनेमाच्या जान राहिल्या आहेत. प्रेमपटाला प्रेक्षकांनी नेहमीच भरभरून प्रतिसाद दिला आहे. ‘LOVE एक्सप्रेस’ मध्ये सहवासातून खुलणाऱ्या प्रेमाची अनोखी कहाणी साकारली जाणार आहे.‘कॅरी ऑन देशपांडे’ या पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर ‘अथर्व ४ यु मिडिया अॅण्ड एन्टरटेन्मेंट प्रा.लि’ची ‘LOVE एक्सप्रेस’ ही दुसरी चित्रपट निर्मिती आहे. वैभव तत्ववादी व पूजा सावंत ही फ्रेश जोडी ‘LOVE एक्सप्रेस’च्या निमित्ताने एकत्र झळकणार असून ‘दगडी चाळ’ फेम दिग्दर्शक चंद्रकांत कणसे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

या चित्रपटाचे लेखन संजय जमखंडी यांचं असून चित्रपटाला चिनार-महेश यांच संगीत लाभलं आहे. या प्रेमकथेचा अनोखा पैलू प्रेक्षकांना निश्चितच भावेल असा विश्वास निर्माते गणेश हजारे यांनी व्यक्त केला. येत्या २५ मे पासून ‘LOVE एक्सप्रेस’च्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.