Sign In New user? Start here.
vajandar sai and priya's film

बारीक होण्याच्या धडपडीचं रहस्य काय

 
 
 
 
 
"बारीक होण्याच्या धडपडीचं रहस्य काय"?

वजनदार माणसांना टेन्शन असतं ते बारीक होण्याचं... जाड असण्यापासून ते बारीक होण्याच्या प्रवासाची मजेदार गोष्ट 'वजनदार' चित्रपटातून प्रेक्षकांपुढे येणार आहे. 'लॅन्डमार्क फिल्म्स निर्मित या बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला. ११ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

'लॅन्डमार्क फिल्म्स'च्या विधि कासलीवाल यांनी 'वजनदार' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सचिन कुंडलकर यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. तर मराठीतल्या ग्लॅमरस आणि स्टार अभिनेत्री सई ताम्हणकर, प्रिया बापट, चॉकलेट बॉय सिद्धार्थ चांदेकर, चेतन चिटणीस यांच्या यात भूमिका आहेत. क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा पुत्र चिराग पाटील या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहेत. उत्तम स्टारकास्ट, वेगळा विषय आणि फ्रेश लुक ही या चित्रपटाची खासियत आहे. सई आणि प्रियाच्या वजनदार भूमिकांमुळे या चित्रपटाविषयी गेलं वर्षभर इंडस्ट्रीत उत्सुकता आहे.

ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर आणि प्रिया बापट यांनी खास या भूमिकांसाठी वजन वाढवलं आहे. त्या किती वजनदार झाल्या आहेत, ते या ट्रेलरमधून दिसतं आहे. त्यांच्या जाड असण्याचा आणि त्यानंतर बारीक होण्याचा धमाल प्रवास या चित्रपटात आहे. मात्र, त्या बारीक होण्याची धडपड का करू लागतात, हे रहस्य मोठ्या पडद्यावरच पाहण्यात गंमत आहे. चापूनचोपून साडीतल्या घरंदाज लुकमधली सई आणि 'बबली' लुकमधली प्रिया यांच्यातली केमिस्ट्रीही मस्त जमून आली आहे. ट्रेलरमधूनच चित्रपट फ्रेश, कलरफुल दिसतो आहे. तसंच या कथानकाला संवेदनशील पदरही असल्याचंही दिसून येत आहे. त्यामुळे जाड असणं-बारीक होणं याच्या पलिकडे जाऊन आयुष्याविषयीचा वेगळा दृष्टिकोन हा चित्रपट देईल, असं या ट्रेलरमधून जाणवत आहे.

'ज्या बारीक नसतात, त्या जाडच असतात' असं सांगणाऱ्या ट्रेलरनं सोशल मीडियात लक्ष वेधून घेतलं आहे. दिवाळीनंतर ११ नोव्हेंबरला प्रदर्शित होणारा 'वजनदार' प्रेक्षकांना नक्कीच वजनदार मनोरंजन देणार आहे.