Sign In New user? Start here.
well done bhalya team celebrate eco friendly holi

"वेल डन भाल्या’ चित्रपटातील कलाकारांची इको फ्रेंडली होळी

 
 
 
'‘वेल डन भाल्या’ चित्रपटातील कलाकारांची इको फ्रेंडली होळी

होळी म्हणजे रंगांचा सण. होळीच्या या रंगामध्ये रंगत ‘वेल डन भाल्या’ या चित्रपटाच्या टीमने अनोखी होळी साजरी केली. अनिष्ट रुढींचे दहन करत कलाकारांनी इको फ्रेंडली होळी साजरी केली तसेच येणारे वर्ष सर्वांना सुखासमाधानाचे जावो अशी सदिच्छा ही यावेळी व्यक्त केली.

‘वेल डन भाल्या’ या चित्रपटात खेळणं आणि जगणं यांचा मेळ घालणाऱ्या भाल्या नावाच्या धाडसी मुलाच्या जिद्दीची कथा पहायला मिळणार आहे. जिद्दीने पेटून उठलेल्या भाल्याची, त्याच्या ध्येयवेड्या प्रवासाची ही कहाणी सर्वांनाच प्रेरणा देणारी आहे.

नितीन कांबळे दिग्दर्शित ‘वेल डन भाल्या’ या चित्रपटात रमेश देव, संजय नार्वेकर, अलका कुबल, मिताली जगताप, गणेश यादव, शरद पोंक्षे, संजय खापरे, अंशुमाला पाटील राजेश कांबळे, अंशुमन विचारे, नम्रता जाधव, गॅरी टॅंटनी बालकलाकार नंदकुमार सोलकर, सौरभ करवंदे अशी कलाकार मंडळी आहेत. अचिंत्य फिल्म्स व सिद्धी आराध्या फिल्म्स प्रस्तुत के. चैताली व अमोल काळे निर्मित वेल डन भाल्या’ २५ मार्चला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.