Sign In New user? Start here.
Well Done Bhalya.

"वेल डन भाल्या’च्या रूपाने क्रिकेटचे भावविश्व रुपेरी पडघावर

 
‘मुंबई पुणे मुंबई-2 सात दिवसात सात कोटीं
 
"‘वेल डन भाल्या’च्या रूपाने क्रिकेटचे भावविश्व रुपेरी पडघावर

गेल्या अनेक दक्षकांपासून संपूर्ण जगाला वेडावून सोडणारा क्रिकेट खेळ. अनेक क्रिकेट रसिकांच्या मनात घर करून बसला आहे. १९८३ ला कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने वेस्ट इंडीजला हरवून कपिल ब्रिगेडने विश्वचषक जिंकून आणला होता. त्या नंतर २०११ साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली वानखेडे स्टेडियमवर भारत व श्रीलंका यांच्या अंतिम सामना झाला. धोनी ब्रिगेडने भारताला पुन्हा एकदा विश्वचषक मिळवून दिला. हे दोन्ही क्षण म्हणजे इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरात लिहले गेले. त्या वेळी संपूर्ण भारताने दिवाळी सण साजरा केला होता.

या चित्रपटातील भाल्या हा एक आदिवासी समाजातील क्रिकेटने झपाटून सोडलेला एक युवक. त्याच्या तना, मनात, उठता बसता डोक्यात एकच विषय क्रिकेट – क्रिकेट. त्यासाठी त्याने स्वतःला या विश्वात झोकून दिला आहे क्रिकेटचा रोमांच थरार, रसिकांच्या भावंना केलेला हुळूवार स्पर्श व एका जिद्दी युवकाची कहाणी आपणाला ‘ वेल डन भाल्या ’ या चित्रपटात पाहण्यास मिळेल.

या चित्रपटात रमेश देव, संजय नार्वेकर, अलका कुबल, मिताली जगताप, गणेश यादव, शरद पोंक्षे, संजय खापरे, राजेश कांबळे, अंशुमन विचारे, नम्रता जाधव, अंशुमाला पाटील, बालकलाकार – नंदकुमार सोलकर (भाल्या), सौरभ करवंदे अशी तगडी स्टार मंडळी आहेत.

अचिंत्य फिल्मस् व सिद्धी आराध्या फिल्मस् निर्माते - के.चैताली , अमोल काळे, सह-निर्माते – सुनिल महाजन, दिग्दर्शक - नितीन कांबळे, संगीतकार – तृप्ती चव्हाण छायाचित्रण, आय. गीरीधरण, शानू सिंह रजपूत, लेखक - नितीन सुपेकर, गीतकार - शशी तुपे, प्रसिद्धी – रामकुमार शेडगे, पार्श्वसंगीत - तृप्ती चव्हाण, ध्वनी - दिनेश उच्चील, शांतणु आकेरकर, संकलक - प्रवीण कुमार, समिर शेख, कला दिग्दर्शक - महेंद्र राऊत, रंगभूषा - लक्ष्मण जाधव, निर्मिती व्यवस्थापक - संजय कांबळे, वेशभूषा - चैत्राली डोंगरे यांची आहे. हा चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्र प्रदर्शित होईल असे चित्रपटाचे निर्माते व दिग्दर्शक यांनी सांगितले.