Sign In New user? Start here.

Mifta newsletter - 2

Mifta Awards

 

 

मराठी पाऊल पड्ते पुढे


अनुया म्हैसकर

मराठी सिनेसृष्टीत घेतल्या जाणार हा पहिलाच एवढा मोठा सोहळा असून मराठी रंगभूमी आणि चित्रपट विश्वाचा चेहरा मोहरा पालटून टाकण्यात मिफ्ताचा मोठा सहभाग राहणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात सोहळा आयोजित करण्याचं म्हटलं तर त्याला खर्चही खूप जास्त लागतो. पण मराठी कला क्षेत्राच्या विकासासाठी अनेक प्रायोजक धावून आलेत. ‘मिफ्ता’च्या अनेक प्रायोजकांपैकी एक मुख्य प्रायोजक म्हणजे ‘म्हैसकर फाऊंडेशन’. ‘मिफ्ता’च्या निमित्ताने प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या आणि म्हैसकर फाऊंडेशनच्या संचालिका अनुया म्हैसकर यांच्याशी केलेली बातचीत.....Read More >

 

लंडनच्या इतिहासातील सर्वात मोठा सोहळा


डॉ.महेश पटवर्धन

दुबई या सुंदर शहरात ‘मिफ्ता’चा पहिला सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. पहिलंच वर्ष असून या सोहळ्याला कलाकार आणि प्रेक्षकांचा सा-या जगभरातून प्रचंड प्रतिसाद लाभला. ‘मिफ्ता’चा दुसरा सोहळा लंडन शहरात आयोजित केला आहे. ‘मिफ्ता’ हा सोहळा लंडनमधील मराठी लोकांसाठी आणि मराठी कलाकारांसाठीही सदा आठवणीत राहणाराच ठरणार असल्याची ग्वाही या सोहळ्याचे संयोजक डॉ.महेश पटवर्धन यांनी दिली आहे. लंडनच्या इतिहासातील हा सर्वात मोठा मराठी कार्यक्रम असणार आहे. मिफ्ताच्या निमित्ताने त्यांच्याशी केलेला हा संवाद...Read More >

 

‘मिफ्ता’ मराठीतील ऑस्कर पुरस्कार


श्री. अनिल नेने

लंडन येथे होणा-या मिफ्ता या सोहळ्याच्या लंडन कमिटीत संदिप पाध्ये, डॉ. महेश पटवर्धन, महराष्ट्र मंडळ लंडनचे अध्यक्ष श्री.अविनाश धोपटकर, श्री. काणेगांवकर यांच्याबरोबरच युरोपमधील कार्यकर्ते व प्रसिद्ध लेखक श्री.अनिल नेने यांनाही सामावून घेण्यात आहे. ह्याबरोबरच हाऊंन्स्लो, इलफ्रर्ड, मिल्टन किन्स, रेडींग, न्यु कासल, नॉर्वेमा आणि वेल्स येथील महाराष्ट्र मंडळेही या सोहळ्यात सहभागी आहेत. यानिमित्ताने श्री. अनिल नेने यांच्याशी केलेली बातचीत.....Read More >

 
 

आपण सगळेच रोज नवीन कलाकार


श्रीरंग गोडबोले

गेल्या कित्येक वर्षाची मराठी रंगभूमीची परंपरा सा-या जगाला माहिती व्हावी यादॄष्टीने या सोहळ्यातून सिनेमाबरोबरच रंगभूमीवरील कलाकार आणि तंत्रज्ञांचाही सन्मान केला जातो. सद्या मराठी रंगभूमीचे चांगले दिवस आले असून अनेक नाटकांचे अर्ज या पुरस्कारासाठी येत असल्याने त्यातून योग्य नाटकांची निवड करण्यासाठी तीन प्रतिभावंत परिक्षकांची एक कमिटी नेमण्यात आली आहे. त्यात प्रसिद्ध निर्माते, लेखक, दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांचाही समावेश आहे. त्यांच्याशी केलेली ही बातचीत... Read More >