Sign In New user? Start here.

Movie special Zagmag 2013

मराठी सिनेमाच्या बदलत्या प्रवाहात अनेक वेगळ्या पठडीतले विषय सिनेमांसाठी वापरले जात असून सामाजिक, राजकीय, नातेसंबंध यांवर भाष्य करणारे कथानक प्रेक्षकांसमोर आणले जात आहेत. अनेक कौटुंबिक सिनेमे मराठी प्रेक्षकांनी याआधी पाहिले आहेत, मात्र त्यातही एक वेगळे रंग उलगडणारा ‘माझा मी’ हा सिनेमा नुकताच येऊन गेला. ‘एव्हीएनव्ही मोशन पिक्चर्स’या संस्थेची आणि अतुल वनगे व निनाद वनगे यांची पहिलीच निर्मिती असलेला हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. सिनेमात एक कौटुंबिक आणि प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असून अमेरिकेतील कित्येक प्रेक्षकांच्या मागणीवरून ‘माझा मी’ हा सिनेमा झगमग टीमतर्फ़े लवकरच अमेरिकेतील प्रेक्षकांना दाखवला जाणार आहे. त्यामुळे ‘माझा मी’सिनेमाविषयीची संपूर्ण माहिती, प्रसारमाध्यमांचा प्रतिसाद, सिनेमाचे करण्यात आलेले प्रमोशन या सर्वांची माहिती या न्य़ुजलेटरमध्ये देत आहोत.
 
 
रितेशने मराठी चित्रपट निर्मितीत पदार्पण केल्याची चर्चा नुकतीच रंगली, त्यानंतर रितेशने मराठी चित्रपटात अभिनयाचा श्रीगणेशा ही केलाय. आता रितेशने आणखी एक पाऊल पुढे टाकत ‘माझा मी’ या आगामी सिनेमासाठी व्हॉईसओव्हर दिला असून नुकतंच खार येथील एका स्टुडिओत हे रेकॉर्डींग करण्यात आले.