Sign In New user? Start here.

झगमग न्युजलेटर १

'बालगंधर्व'ने "देवदास'पेक्षाही भरभरून दिले - नितीन देसाई

झगमग फिल्म फेस्टीव्हल आता नॉर्थ कॅरोलिनात

तुम्ही ‘बालगंधर्व’ सिनेमा बघितलाय का? काय...? नाही ? मग तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. येत्या २८ ऑगस्टला नॉर्थ कॅरोलिना येथील गॅलक्सी थिएटर मध्ये या चित्रपटाचा शो होणार आहे. परदेशातील प्रेक्षकांची मराठी चित्रपटांची भूक भागविण्याचं काम झगमग मराठी फिल्म फेस्टीव्हल करतंय. या फेस्टीव्हलचं पहिलं सत्र गेल्या २० ऑगस्टला झालं. यात दाखविण्यात आलेल्या ‘बालगंधर्व’ आणि ‘फक्त लढ म्हणा..!’ बहुचर्चीत चित्रपटांना २० ऑगस्टला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

Zagmag.net ग्लोबल महाराष्ट्राचं एण्टरटेन्मेंट पोर्टल ज्यावर मनोरंजन क्षेत्रातील ताज्या घडामोडी तसेच राजकीय घडामोडींच्या बातम्या वाचकांना वाचता येतात. नुसत्या बातम्या आणि लेख देणं एवढंच Zagmag.net करत नसून अनेक इव्हेंटही घेतात. त्याहीपलीकडे जाऊन लोकांशी संवाद साधण्याचं अतिशय आधुनिक माध्यम म्हणजे e-Newsletterचा वापर करून विविध कार्यक्रमांना प्रसिद्धीही दिल्या जाते. जेणेकरून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावं. २०११च्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाच्या प्रसिद्धीसाठी e-Newsletter तयार केले होतं. शिवाय महिन्यात लंडन येथे होणा-या मिफ्ता सोहळ्याचेही e-Newsletter Zagmag.net तयार करत आहेत.

Zagmag.net मनोरंजनाच्या ऑनलाईन विश्वात आपला एक वेगळाच ठसा निर्माण केला आहे. अल्पावधीतच जगभर पसरलेल्या लोकांशी संवाद साधण्याचं काम Zagmag.net नं केलं आहे. शिवाय रसिकांच्या मनोरंजनाचंही काम केलं आहे. या न्युजलेटरमध्ये Zagmag.net तर्फ़े करण्यात घेण्यात आलेल्या इव्हेंट्सचा लेखाजोखा देण्यात आला आहे.