Sign In New user? Start here.

द्वंद्व

आपल्या मनात नेहमी द्वंद्व असतात...समजायला लागण्याच्या वयापासून. काय निवडायचं ? ते कळत नसतं. दोन रस्ते...dilemma... कुठला रस्ता कुठे नेईल?द्वंद्व !..... श्रेयस की प्रेयस?..जे आदर्शाकडे नेणारं आहे ते ? की जे आपल्याला प्रिय वाटतंय ते? कुठलं निवडावं?...मग मनात भीतीयुक्त प्रश्न...''म्हणजे? जे प्रिय आहे ते आदर्श नाही की काय? हा तर जीवनातला सर्वात मोठा ...चिरंतन संघर्ष ! !

द्वंद्व

 

संगीता जोशी

आपल्या मनात नेहमी द्वंद्व असतात...समजायला लागण्याच्या वयापासून. काय निवडायचं ? ते कळत नसतं. दोन रस्ते...dilemma... कुठला रस्ता कुठे नेईल?द्वंद्व !..... श्रेयस की प्रेयस?..जे आदर्शाकडे नेणारं आहे ते ? की जे आपल्याला प्रिय वाटतंय ते? कुठलं निवडावं?...मग मनात भीतीयुक्त प्रश्न...''म्हणजे? जे प्रिय आहे ते आदर्श नाही की काय? हा तर जीवनातला सर्वात मोठा ...चिरंतन संघर्ष ! !

संजय जोशी, नचिकेता या पुस्तकाचे लेखक, हे एकदा आपल्या भाषणात म्हणाले होते, ''मी हा प्रश्न थोडा सोपा करून घेतला. तो असा की श्रेयस आधी की प्रेयस आधी?'' म्हणजे दोन्ही निवडायचं !! फक्त कोणती गोष्ट आधी व कोणती नंतर, एवढाच प्रश्न उरतो.

Time Factor !

मग त्यांनी ठरवलं, जे प्रिय आहे ते आधी मिळावायचं.. शिक्षण....नोकरी....चांगला पैसा ....हे सगळं हवं आहे... ते का नाही स्वीकारायचं? ते टाळून आधी श्रेयस कडे जाणं म्हणजे मन मारून तिकडे जाणं. आणि तसं मन मारून जर श्रेयस कडे गेलो, तर अतृप्ती टोचत राहणार ! श्रेयसकडे मन पूर्ण समर्पित होणार नाही...म्हणून प्रेयस आधी. हवं ते मिळवून त्याचा उपभोग घेऊन नंतर श्रेयस !

फक्त यात एकच काळ्जी घ्यायला हवी, प्रेयस चा मार्गही श्रेयस च्या वाटेने जायला हवा. तसा जर तो गेला नाही तर प्रेयस मिळविण्यातही आनंद मिळत नाही. समाधान मिळत नाही. आनंद आणि समाधान हे सुध्दा एक द्वंद्वच! कसं?

sangita joshi

मध्यंतरी टी.व्ही. वर एक सिनेमा पाहिला. ''तार्यांचचे बेट.'' तुम्हीही पाहिला असेल.

मुलाचा हट्ट पुरवायचा व त्याला पंचतारांकित हॉटेलात रहायला न्यायचं म्हणून गरीब प्रामाणिक बाप नोकरीत लाच घेऊ लागतो...जीवन बदलून जातं...म्हणजे झोप येईनाशी होते...श्रेयस सोडूनही पंचतारांकित हॉटेल चा आनंद मिळवता आला असताच. पण त्याऐवजी, कोणाची तरी सापडलेली पंचवीस हजार रुपयांनी भरलेली बॅग परत करण्यात जे समाधान आहे ते त्या क्षणिक आनंदापेक्षाही मोठं आहे. हे द्वंद्व हाच सिनेमाचा केंद्र बिंदू आहे. यात आदर्श बापाने मुलावर कसे योग्य संस्कार केले पाहिजेत ते प्रभावी रीत्या दाखविले आहे. आनंदापेक्षाही आत्मिक समाधान मोठे आहे. पुन्हा इथेही श्रेयस व प्रेयस !

आपण काय निवडायचं हेच फक्त आपल्या हाती असतं. आपल्यापुढे काय पर्याय ठेवायचे हे कुठलीतरी 'शक्ती' ठरवत असते.दोन मार्ग नेहमीच समोर येतात. निवडणार आपणच.

आणखी एक जोडी. व्याप्ती आणि खोली. आपल्याला जीवनाची व्याप्ती वाढवायचीय् का खोली? Jack of all trades व्हायचं की master of 'one ' व्हायचं? (none म्ह्टलं नाही, हे लक्षात घ्या.)

इथं तुम्हाला मिळालेली ''फ्री विल्'' वापरा....फ्री विल् चा अर्थ हा आहे. निवड-स्वातंत्र्य ! तुमच्या आयुष्याचे, या अर्थाने शिल्पकार तुम्हीच आहात.

देव आहे किंवा तो नाही?....you have a free choice to incline towards any statement ! दोन्हीपैकी काहीही निवडा...कोणत्या निवडीमुळे जीवन सुखकर होईल हे तुमचं तुम्ही अनुभवा..सक्ती कुठलीच नाही.. जो काय फायदा-तोटा असेल तो तुमचा ! केवळ तुम्ही तुमच्या मर्जीने निवडलेला......

टिप - तुम्हाला हा ‘सुचेल ते काहीही’ ब्लॉग कसा वाटतो. त्यात मी रेखाटत असलेले अनुभव कसे वाटतात. याबाबतच्या प्रतिक्रिया मला कळवा. त्यासाठी खालील तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया देऊ शकता.

संगीता जोशी