Sign In New user? Start here.

आज मराठी गझलबद्दल अधिक जाणून घेऊ या. गझल हा एक काव्यप्रकार आहे. जसे सुनीत, लावणी, अभंग,पोवाडा इ. काव्यप्रकार आहेत तसाच हाही. मूळचा अरबी-फारसी व नंतर उर्दूतून हा काव्यप्रकार आपल्याकडे आला. नंतर इतर अनेक भाषांमध्येही गझल लिहिली जाऊ लागली. तशी ती मराठीतही आली. एक गझल आधी वाचू या.

कुठे आहेस तू.... ???

 

संगीता जोशी

देवा ! परमेश्वरा !!....कुठे रे आहेस तू ?... का रे बाबा, मला हे दुःख दिलंस ?..

हे आणि अशासारखे अनेक उद्गार माणूस बरेचदा काढत असतो. अगदी नास्तिक असलेले लोकही असा नामोच्चार अनवधानाने सह्ज करत असतात. जितका ‘आई ग !’ हा उद्गार मुखातून सहजतेने येतो तितक्याच सहजतेने देवाला संबोधित केलं जातं. जेव्हा माणूस हतबल होतो, काय करावं हे सुचत नाही, मार्ग सापडत नाही, तेव्हा तेव्हा तो अशी आळवणी करतो. याचा अर्थ देव येऊन काही प्रश्न सोडवणार नसतो. त्याचं नाव घेणार्याहलाही हे माहीत असतं. पण त्याच्या हताश भावनेला शब्द मिळतात, कोंडी फुटण्याला थोडी वाट मिळते. त्यामुळे थोडं हलकं वाटतं. देवाचा असा उपयोग होत असेल, कुठूनही परिस्थितीची तीव्रता जर कमी होत असेल तर अंधश्रध्देवर आक्षेप घेणारेही कदाचित्‍ हा मुद्दा ‘वैयक्तिक’ म्हणून सोडून देतील असं वाटतं.

आत्ता आपल्या देशाची, भ्रष्ट व स्वार्थी आणि म्यूल्यहीन समाजाची स्थिती पाहूनही देवाचीच आठवण झाल्याशिवाय रहात नाही. असं वाटतं की ‘’हे चाललंय्‍ तरी काय ? कुठे भरकटत चाललाय् माणूस ? धर्माच्या नावाखाली फोफावतोय्‍ अधर्म आणि दहशतवाद ! कोणाला कशाचा विधिनिषेध नाही. देवाला दिसतंय् का हे सगळं? बहुधा तो आंधळा , बहिरा अपंग ...असा आहे. मला त्याला खूप काही सांगायचंय्‍, तो दिसत नाही म्हणून निदान त्याला पत्र पाठवून कळवायचंय्... पण.....

वाचा हे गीत....

भगवान तुझे मैं खत लिखता, पर तेरा पता मालूम नहीं
रो रो लिखता, जब भी लिखता,पर तेरा पता मालूम नहीं.....

अडचण हीच आहे, देवा ! तुला खूप काही सांगयचं आहे...पत्र लिहून कळवायचं आहे,पण तुझा पत्ताच माहीत नाही...!! असं म्हणतात की तू सगळीकडे आहेस. म्हणूनच तुझा नेमका पत्ता कोणालाच माहीत नसावा....तुझा पत्ताच नाही, मग तू नाहीसच की काय..?असा अर्थही यातून निघू शकतो...

हे गीत 1953 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘’मनचला’’ य हिंदी चित्रपटातील आहे. खूप वर्षांपूर्वी ते ऐकलं होतं. पण नंतर कुठेच शोध घेता येत नव्हता. कारण हे गाणं माहीत आहे का म्हटल्यावर सगळ्यांकडून नकारार्थीच उत्तर यायचं.

पुढे कवी लिहितो,

तुझे बुरा लगे या भला लगे, तेरी दुनिया अपनेको जमी नहीं
कुछ कहते हुए डर लगता है, यहां कुत्तोंकी कुछ कमी नहीं
मालिक, तुझे सबकुछ समझाता, पर तेरा पता मालूम नहीं....1
मेरे सरपे दुखों की गठरी है, रातों को नहीं मैं सोता हूं
कहीं जाग उठे न पडोसी, मैं इसलिए जोरसे नहीं रोता हूं
तेरे सामने बैठके मैं रोता, पर तेरा पता मालूम नहीं.....2
कुछ कहूं तो दुनिया कहती है, ‘आंसू न बहा बकवास न कर’
ऐसी दुनियामें रख के मुझे, मालिक, मेरा सत्यानास न कर
तेरे पास मैं खुद ही आ जाता, पर तेरा पता मालूम नहीं.....3

ह्या गाण्याचे गीतकार व गायक कोण ही माहिती उपलब्ध नाही. मात्र संगीत चित्रगुप्त यांचे आहे. सरळ, सोप्या शब्दातलं हे गाणं मनाला अस्वस्थ करून जातं.

चित्रपटात हे गाणं एक भिकारी गात असतो. तो प्रथम मंदिराबाहेर उभा राहून भीक मागतो, पण कोणीच काही देत नाही. मग एका मशिदीबाहेर थांबतो, तिथेही पदरी निराशाच येते. म्हणून तो एक दारूच्या गुत्त्याबाहेर उभा राहून भीक मागतो. तिथे लोक त्याला दया दाखवितात. तेव्हा त्याच्या तोंडी एवढाच संवाद आहे, ‘’ देवा, राहतोस कुठे आणि पत्ता मात्र भलताच ( मंदिर-मशिदीचा) देतोस !’’

करुणा हे देवाचं रूप आहे. ज्यांनी त्याला भीक घातली ते लोक सहृदय होते.जरी ते गुत्त्यातून बाहेर पडले तरी त्यांच्या हृदयात ईश्वर वास करत होता. मंदिर-मशिदीतून जाणारे लोक देवदर्शन घेत होते पण त्यांच्या हृदयात माणसाबद्दल करुणा नव्हती. मग देव कोठे भेटणार ? तो मंदिरात नाही, तर मदत देणार्याा हातामध्ये आहे ! म्हणूनच साईंचा संदेश आहे, HELP EVER, HURT NEVER !!

संगीता जोशी