Sign In New user? Start here.

प्रेम की..... प्रे..... ?

संक्रांतीचा सण येऊन गेला. आकाशात पतंगांचा जल्लोष बघायला मिळाला.हल्ली वाहिन्यांच्या माध्यमातून सगळीच अंतरं वितळून गेल्यासारखी झालीयत्, त्यामुळे गुजरात राज्यातील पतंगोत्सव पाहायचीही संधी मिळते.ते पतंग खूप वेगळे होते असं वाटलं. एक पतंग म्हणजे पतंगांची लांबलचक माळच ! मनात आलं, यांचं वजन वाढलं तरीही हे इतके उंच कसे जातात? काही तर पॅरॅशूटसारखे होते ! उंच जाण्याच्

प्रेम की..... प्रे..... ?

 

संगीता जोशी

प्रेम ही खरोखर अद्भुत गोष्ट आहे, कारण त्या अदृश्य धाग्यात हृदयांना एकत्र बांधण्याची ताकद आहे. सृष्टीनिर्मिती मागे हिग्जबोसॉन कण आहेत येथ पर्यंत शास्त्रज्ञ नुकतेच येऊन पोहोचले आहेत. प्रेम या शक्तीचा उगम...स्रोत कोठे असेल? जाऊ दे. मनाशी त्याचा संबंध आहे, ही माहिती पुरेशी आहे. मानवाखेरीज इतर प्राण्यांमधेही 'प्रेम' भावना दिसतेच.पाळीव प्राणी ते सिध्द करतातही. एवढंच नाही, तर झाडे-वृक्षांनाही ते समजते व ते प्रतिक्रियाही देतात, हे जगदीश्चंद्र बोस यांनी प्रयोगाने दाखवून दिले होते. याही पलीकडची उदाहरणे आहेत. जळगावचे डॉ. पूर्णपात्रे यांनी सिंहाच्या मादीपिल्लाला घरी आणून वाढविले होते.ते अनाथ पिलू त्यांना जंगलात सापडले होते.ती सिंहीण मोठी झाल्यावर(तिचे नाव सोनाली. याच नावाचं त्यांनी लिहिलेलं पुस्तक जरुर वाचा.) त्यांनी तिच्या व लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तिला त्यावेळी पेशवे पार्क,पुणे येथे सोडले होते. पुढे डॉक्टर जेव्हा जेव्हा तिला भेटण्यास येत व सोनाली अशी हाक मारत, तेव्हा ती त्यांना ओळखत असे, त्यांच्या जवळ येत असे व प्रेमाने त्यांचे हात चाटत असे. अनेक लोकांनी हे दृश्य पाहिले आहे. ती मरेपर्यंत त्यांना विसरली नाही !!

वाईट याच गोष्टीचं वाटतं, की हिंस्त्र प्राणीही प्रेमाने वश होतात, मग मानवच आज प्रेम विसरून हिंस्त्र का झाला आहे? बारकाईने पाहिलं तर, प्रेमाच्या अभावामुळेच आज लढाया, युध्दे, दहशतवाद हे परिणाम जगभर दिसत आहेत. एकाच आदमची किंवा मनूची ही प्रजा आज एकमेकांच्या जिवावर कशी उठू शकते? विश्वबंधुत्व समजावून घेऊन प्रेम जोपासण्याऐवजी सगळीकडे विध्वंस का फोफावला आहे? विचारशील माणसाचं हृदय हेलावून जातं ! सामान्य माणूस फक्त हतबल होतो, कवीचं कोमल ह्दय मात्र प्रभावी शब्दात मन उघडं करतो.

कवी प्रदीप (ऐ मेरे वतन के लोगो... हे अजरामर गीताचे कवी) यांचं एक गीत फारच अस्वस्थ करून जातं. ते त्यांनी लिहिलं तो काळ हिंदुस्थानच्या फाळणीनंतरचा असावा. पण त्यात वर्णन केलेली माणसाची दुर्दशा आजही बहुतांशी तशीच आहे, कारणं काहीही असोत !! ती कविता इथे वाचा.....

आज इन्सानको ये क्या हो गया, इसका पुराना प्यार कहॉं खो गया...धृ.
कैसी ये मनहूस घडी है, भाइयोंमें जंग छिडी है
कहींपे फूल कहींपर ज्वाला,जाने क्या है होनेवाला
सबका माथा आज झुका है, आजादीका जुलूस रुका है
चारोंओर दगाहि दगा है, हर छुरेपर खून लगा है
आज दुखी है जनता सारी, रोते हैं लाखों नरनारी
रोते हैं ऑंगन गलियारे, रोते आज मुहल्ले सारे
रोती सलमा रोती है सीता, रोते हैं कुर्रान ओ गीता
आज हिमालय चिल्लाता है , कहॉं पुराना वो नाता है?
डस लिया सारे देशको जहरी नागोंने, घरको लगा दी आग घरके चिरागोंने...1

अपना देश वो देश था भाई, लाखोंबार मुसीबत आई
इन्सानोंने जान गँवाई, पर बहनोंकी लाज बचाई
लेकिन अब वो बात कहॉं है, अब तो केवल घात यहॉं है
चल रही हैं उल्टी हवाएं, कॉंप रही थरथर अबलाएं
आज हरेक ऑंचलको है खतरा, आज हरेक घूंघटको है खतरा
खतरेमें है लाज बहनकी, खतरेमें चुडियॉं दुल्हनकी
डरती है हर पॉंव की पायल, आज कहीं हो जाए न घायल
आज सलामत कोइ न घर है, सबको लुट जाने का डर है
हमने अपने वतनको देखा, आदमीके पतनको देखा
आज बहनोंपर भी हमला होता है, दूर किसी कोनेमें मजहब रोता है.....2

किसके सर इल्जाम धरें हम, आज कहॉं फरियाद करें हम
करते हैं जो आज लडाई, सबके सब हैं अपने भाई
सबके सब हैं यहॉं अपराधी, हाए मुहब्बत सबने भुला दी
आज बही जो खूनकी धारा, दोषी उसका समाज है सारा
सुनो जरा ऐ सुननेवालों, आसमॉं पर नजर घुमा लो
एक गगन में करोडों तारे, रहते हैं हिलमिलके सारे
कभी न वो आपसमें लडते, कभी न देखा उनको झगडते
कभी नहीं वो छुरे चलाते, नहीं किसीका खून बहाते
लेकिन इस इन्सान को देखो,धरतीकी संतान को देखो
कितना है ये हाय कमीना, इसने लाखोंका सुख छीना
की है इसने आज तबाही, देंगे उसकी ये मुखडे गवाही
आपसकी दुष्मनीका ये अंजाम हुआ, दुनिया हसने लगी देश बदनाम हुआ....3

कैसा ये खतरेका पहर है, आज हवाओंमें भी जहर है
कहीं भी देखो बात यही है, हाय भयानक रात यही है
मौत के सायेमें हर घर है, कब क्या होगा किसे खबर है
बंद है खिडकी बंद हैं द्वारे, बैठे हैं सब डरके मारे
क्या होगा इन बेचारोंका, क्या होगा इन लाचारोंका
इनका सबकुछ खो सकता है, इनपे हमला हो सकता है
कोई रक्षक नजर न आता, सोया है आकाश पे दाता
ये क्या हाल हुआ है अपने संसारका, निकल रहा है आज जनाजा प्यारका.....4

खरंच का आज प्रेमाची प्रेतयात्रा निघाली आहे?.....
यासाठीच मला ही कविता तुमच्यापर्यंत न्यायची होती, की कवीने कळकळीने ही त्याची वेदना आपल्या साध्या पण उत्कट शब्दात व्यक्त केली आहे. ही आपल्या सर्वांची वेदना आहे. काळ पुढे गेला असेल, पण कवितेत वर्णन केलेली परिस्थिती आजही तशीच आहे.
माणसा माणसांमधील प्रेम परत यायला हवं, प्रेम आणि प्रेत, हे केव्हढे जवळचे शब्द !! पण त्यांना दूर करायला हवं. म च्या जागी त येता कामा नये. आपण जागे होऊ या. कवी प्रदीप ना आपण धन्यवाद देऊ या त्यांनी आपल्याला सावध केलं आहे.......
संगीता जोशी यांचे दर आठवड्यातील वेगवेगळे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात. यासाठी खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमची प्रतिक्रिया नोंदवू शकता. तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत.(झगमग टीम)

....संगीता जोशी