Sign In New user? Start here.

अविस्मरणीय भेटी-गाठी...

अविस्मरणीय भेटी-गाठी....

 

सुभग ओंक

प्रेम हा असा “natural resource” आहे जो दिल्याने अधिकच वाढतो.

आपले आयुष्य रुटीन होऊन जाते आणि आपल्याला ते कळत देखील नाही. कधी कधी लक्षात येऊन सुद्धा आपण त्या बाबतीत काहीहि करू शकत नाही, जे चाललं आहे ते बरय असं म्हणून आपण त्या रुटीनचाच एक भाग होऊन जातो. मी असला रुटीन-नेस टाळण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. कामात नवीन नवीन “features develop” तर करतोच, त्या साठी नवे algorithms वाचणं/शोधून काढणं हे तर व्यावसायिक दृष्ट्या चालू असतच पण त्याशिवाय नाटकं लिहिणं, गोष्टी लिहिणं, कविता करणं, ब्लॉग लिहिणं, कवितांना चाली लावणं, पेटी वाजवणे, नाटकांचे दिग्दर्शन करणे हे उद्योग हि चालूच असतात. ह्या शिवाय “टी व्ही” बघणे मला खुपच आवडत असल्याने वेळ घालवायचा कसा हा प्रश्न नाही पडत. मला क्रीडा, साहित्य, चित्रपट, मालिका काही म्हणजे काही हि आवडतं....ते वाईट असलं तरीही J पण ह्या सगळ्या गोष्टीही “रुटीन” होऊन जातात .... आणि तेव्हा अनपेक्षित पणे आपण ताजे-तावाने होतो....नुसत्या सहवासाने, प्रतिभेने, साधे-सरळ पणाने आणि मुख्य म्हणजे ‘प्रेमाने’. तसेच काहीसे घडले माझ्या बाबतीत....

शुक्रवारी (५/४/२०१२) मला श्री. श्रीधर फडके ह्यांचा “गीत रामायण” कार्येक्रम बघण्याच योग आला! त्यांचे विवेचन, गाण्याची पद्धत आणि बाबूजीं-ग.दि.मांची किमया मला एक “divine” अनुभव देऊन गेली.... ४ १/२ तास चालेल्या ह्या कार्येक्रमाने मी गहिवरून गेलो. “जेथे जातो राम नरेश, सुभग सुभग तो दक्षिण देश!” हे गीत ऐकताच, “गीत रामायणाशी” माझी नाळ जोडली गेली आहे, असेच काहीसे वाटले! श्रीधर ह्यांच्या मुलीला (प्रज्ञाला) मी लहानपणी “नाटक” शिकवले आहे ... माझी ती ओळख त्यांना करून देताच... श्रीधर ह्यांनी प्रज्ञाला फोन लावला.... मनुष्य कितीहि मोठा असला तरी “गुरुचे” काय स्थान असते ... हे त्यांच्या त्या कृतीत मला दिसले! साधी-सोपी प्रतिमा ... अवास्तवपणाचा लवलेश हि नव्हता श्रीधर ह्यांच्या वागणुकीत.... एवढा मोठं माणूस इतका साधा असू शकतो?

शनिवारी (५/५२०१२) ला माझ्या नाटकाची तालीम संपवून (मी “ऐन वासंतात अर्ध्या रात्री” हे नाटकं सध्या बसवतो आहे)... मी “वाह गुरु” ह्या नाटकाच्या कलाकारांन आणायला गेलो. विजय केंकरे, अद्वैत दादरकर, पूर्णिमा तळवलकर, गिरिजा काटदरे आणि दिलीप प्रभावळकर अशी मंडळी येणार होती. त्यांची व्यवस्था माझ्या कडेच होती..... बायकोने खूप परिश्रम करून घर टाप-टिप केले. विजय हा माझा गुरु व मित्र . पण बाकीचे सगळे नवीनच ... पुन्हा दिलीप काका आमच्या कडे राहणार म्हणजे अजून मोठी जबाबदारी .... पण सगळे व्यवस्थीत यथासांग पार पडले. त्याच दिवशी श्री. श्रीधर फडके ह्यांचा “सुगम संगीताचा” कार्येक्रम हि होता... तो हि खूपच छान झाला. एक मात्र आहे... श्रीधर फडके तयार असूनही कार्येक्रम सुरु व्हायला १ तास उशीर झाला, ह्याची खंत वाटते. ‘IST’ म्हणजे लेटच... असं का होतं? लोकांना सवय लावली पाहिजे वेळेवर येण्याची, वेळेवर कार्येक्रम सुरु करण्याची .... चूक दोघांची हि असते, कलाकार आणि प्रेक्षक! त्या रात्री, दिलीप काका, श्रीधर, विजय ह्यां सगळ्यां बरोबर खूप गप्पा मारल्या.... “कलेच्या अभ्यास”, तो कसा जोपासायचा, तो कसा आपोआप करायचा .... हे शिकलो ... नुसते त्यांना बघून, त्यांना ऐकून, त्यांच्या सहवासात राहून!

रविवारी (५/६/२०१२) सकाळी “सत्यमेव जयते” पहिले .... डोळे पाणावले, हृदय धडधडले, मन व्याकुळले आणि जाणीवांना “अमीर खान” ने हलवले. “टी व्ही” माध्यमाचा एवढा चांगला उपयोग बऱ्याच वर्षात कोणी केला नसेल!! अवश्य पाहण्याजोगा कार्येक्रम..... प्रतिभेचा, आपल्या प्रसिद्धीचा, आपल्या मोठेपणाचा इतका चांगला वापर कुठल्याही “नटाने” केला नसेल! जो विचार, विषय आणि ज्या समस्या तो लोकांपुढे आणणार आहे .... त्याला तितकीच यशस्वी, भावूक आणि कर्तव्यदक्ष व्यक्ती हवी. गुड कार्येक्रम! हा कार्येक्रम बघून आम्ही प्रयोगाला गेलो. मला हा प्रयोग बरोबर वेळेत सुरु करायचा होता .... आणि सगळ्या कलाकार-तंत्राद्यानी मला बहुमोल सहकार्य केले. हि सगळी मंडळी माझ्या हून मोठी (वयाने आणि कर्तृत्वाने हि) .... पण जसे मी सांगेन त्याप्रमाणे त्यांनी मदत केली (सेट्स माझ्या घरी लावण्या पासून). प्रयोग उत्तम झाला... वेळेत संपला ... आणि त्याच्या परिणाम लोकांवर खूप वेळेसाठी राहील ह्या शंकाच नाही.... दिलीप काकांची खरच कमाल आहे. आंगिक, वाचीक आणि सात्विक अभिनायचा उच्चांक होता त्यांचा अभिनय.... कुठेही “preacher” न होता त्यांनी “ailing teacher” ची भूमिका सहजतेने साकारली. त्यांना मी विचारलं तेव्हा ते हि म्हणाले .... “मला साधा प्रोफेसर मांडायचा होता .... जो मरणार आहे, आनंदाने. जीवन-मृत्य बद्दल त्याला काय वाटतं ते तो बोलतो .... प्रवचन करत नाही!”... सुंदर – केवळ – सुंदर अनुभव!

सोमवार (५/७/२०१२) उजाडला ... आता हि लोकं घरचीच झाली होती..... अगदी घर्च्यासार्खीच वागत होती हे पाहून वाटलं की हे हि आपल्यासारखेच आहेत .... अगदी माझ्या-तुमच्या सारखे. सगळे इतके मजेने राहिले की मुन्नाभाई मधले “गांधी”, चौकट राजा, रावसाहेब आणि चिमणराव हे आपल्या घरी आहेत हा विसर पडावा. जोक्स, गम्मत, काही मजेशीर अनुभाव ऐकायला मिळाले. “‘अमिताभ’ बरोबर काम करताना खूप मजा आली”.. हे सांगतानाचे दिलीप काका, त्यांच्या डोळ्यातले ते आदरार्थी भाव मला खूप काही शिकवून गेले. माणूस कितीहि मोठा असला तरी त्याचे पाय जमिनीवरच असावे .... त्याने तो अधिक मोठा होतो!

हि अशी माणसं आयुष्यात येतात, सुखावून जातात .... आणि “रुटीन” आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळते. ह्या लोकांनी मला इतकं प्रेम दिलं, इतकी माया, इतका आदर दिला ! मी ऋणी आहे त्यांच्या... मला पुन्हा जगायचे कसे हे शिकवल्या बद्दल! खरच, “फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश!”

-सुभग ओक

 
आणखी ब्लॉग