Sign In New user? Start here.

“निरागसता”, सर्वात आवडणारी गोष्टं कशी मी हरवून बसलो?

“निरागसता”, सर्वात आवडणारी गोष्टं कशी मी हरवून बसलो?

सुभग ओंक

लहान मुलं गोड, गोंडस तर असतातच पण मोठ्या माणसांपेक्षा श्रीमंत असतात.... त्यांच्या त्या निरागसते मुळे. बरंच अज्ञान, भरपूर विश्वास आणि अफाट निर्भीडपणा हे त्यांच्या अंगी ठासून भरलेलं असतं. माणूस जस-जसा मोठा होतो, तस-तसा लोकं काय म्हणतील हा प्रश्न त्याला भेडसावू लागतो. “मी असं केलं तर माझ्या image ला धक्का तर बसणार नाही ना?”, “माझे मित्र काय म्हणतील?, बॉस कसा react करेल?, बायको पुन्हा ओरडेल का? मुलांसमोर असं वागणं मला शोभतं का?” एक-ना-दोन!

प्रश्न संपत नाहीत... आणि उत्तर सापडत नाहीत. शेवटी काय .... आपण भित्रे, पळपुटे होतो. आपण “आपल्याला हरवून बसतो”. मी ग्रिप्स नाटकं करत असताना “inhibitions” घालवायचे खेळ-Excercises करायचो. पुन्हा “लहान” होण्याचा प्रयत्न करायचो, त्याचा सराव करायचो. पुन्हा ते बालिश वाटायला नको ह्याची हि खबरदारी घ्यायचो. हे सगळं कठीण होतं .... खरच वाटलं नव्हतं मला. आपल्याकडे आपसूक असलेली गोष्टं आपण इतक्या सहजी हरवली कशी? आणि ती पुन्हा मिळवणे असं कठीण कसं काय? बर, नाटका-पुरत, आम्ही सगळे लहान व्हायचो.... पण प्रयोग संपला कि “we were back to being adult, asking questions, loosing innocence”......... पुन्हा प्रश्न सुरु.

काही केल्या मी “लहान” नाही हे तो समजूनच घेत नव्हता. “लहान” होणे शिकावं लागत, त्याचा “अभिनय” करावा लागतो हे त्याला कसा कळणार.... आणि मी तरी त्यला टे कसा पटवून देणार... ‘नाटक’ चालू आहे हे त्या भाबड्या-शुद्ध मनाला कसं पटणार? एकीकडे माझ्या सहज अभिनयावर मी खूश होतो... पण दुसरीकडे मला त्याची निरागसता डिवचत होती...हिणवत होती....”का राहू शकत नाही मी निरागस, एक मातीचा गोळा, ज्याच्यावर कुठले हि संस्कार व्हावेत? कसा हि आकार घडावा....आणि तो सारखा बदलत राहावा....मला नको हे monotonous life: मला उड्या मारायच्या आहेत, जोरात हसायचं आहे..... ओक्सा-बोक्शी रडायचं आहे ... आणि कोणी मला बगतंय का? हा विचार मला मनातून-डोक्यातून काढून टाकायचा आहे... आहे शक्य?

- सुभग ओक

आणखी ब्लॉग