Sign In New user? Start here.

भावनेच्या भरात.....

भावनेच्या भरात.....

 

सुभग ओंक

एक होते गाव, नव्हते त्याला नाव....लोकंही निनावी, फक्त होते भाव. त्या गावामधल्या एका माणसाला मी विचारले, तुम्ही एकमेकांना बोलावता कसे ? तो उत्तरला, भावनेने, आम्हाला नावं जी नसे. तुम्ही एकमेकांना ओळखता कसे? तो म्हणाला, त्यांच्या चेहेऱ्या-वरून, तिथेच तर भाव वसे! आमच्या गावात समूह आहेत, गट नाही, पक्ष नाही. काही सुखी, काही दु:खी, काही मृदू आणि कठोर ही.

पण आम्ही सर्व कामे एकत्र करतो, समुहासाठी जगतो, त्याच्यासाठीच मरतो, आम्ही आहोत एकसंघ, कारण कुणालाच नाव नाही आमच्या यशाची गोम आहे ही यश ते कसं ?? मी विचारले त्याला... तो म्हणाला नाव आले की येते प्रतिष्ठा, समूह आला की येते निष्ठा ...तुमच्या इथे, माणूस आपल्या नावासाठी मरतो, आमच्या इथे, तो आपल्या गावासाठी जगतो,

आमच्या नेत्याला नाव नाही, संवेदना आहेत, हवा तो भाव आहे, तुमच्या पुढाऱ्याला नाव आहे, वेदना आहेत, नको तो भाव आहे फरक छोटा पण महत्वाचा आहे, कोणीतरी म्हणालच आहे, “नावात काय आहे?”

माझं ऐक, हया पुढे नाव नको सांगुस, भाव सांग, जगायाचा हेतु सांग, वागायचे प्रयोजन सांग, कामाचे महत्व सांग, भावानेचा अर्थ सांग, काही ही सांग, पण सांगू नकोस नाव अपुले, कारण, माणासानी नेहेमी इतरांसाठी जगावं कसे काय होणार शक्य, जर असतील तुम्हाला नावं.

मी त्याच गावात राहिलो .... तिथेच मी रमलो मी रडलो, मी हसलो, चिडलो अन रागावलो. खरच, आज मी खूप समाधानी आहे. तुम्हाला माझ्या गावी यायचं आहे?

-सुभग ओक

 
आणखी ब्लॉग