Sign In New user? Start here.

माणूस ‘मोठा’ होतो ....म्हणजे नक्की काय होतं?

माणूस ‘मोठा’ होतो ....म्हणजे नक्की काय होतं?

 

सुभग ओंक

मोठे होणे म्हणजे नक्की काय होणे? मोठे आपण कशाने होतो, काय केल्याने होतो? अजूनही हा प्रश्न मला भेडसावतो, त्रास देतो. लहानपणी वाटे, माझे आई-बाबा आणि माझा भाऊ “मोठे” आहेत.... त्या नंतर शाळेतले सर-टीचर मोठे झाले. हे सगळे वयाने मोठे होते....आजही वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीला मी “अहो” संबोधतो....(इंग्रजी मध्ये सर्वांना first-person मध्ये संबोधले जाते, पण मराठीत आदरार्थी वचन आहे). वयाने मोठ्या असलेल्या माणसाला आदर मिळतो आणि तो मिळालाच पाहिजे. वयस्कर माणूस मोठाच असतो ... कारण “त्याने जास्त पावसाळे पहिले असतात”. ज्या घरात वडील-धार्यांची सेवा-सुश्रुषा केली जाते, मन-सन्मान ठेवला जातो ...तिथेच खरे सुख्य नांदते, असे स्मृतीवचन आहेच.

‘पैसा’ अशी गोष्टं आहे कि ती कोणा हि माणसाला “मोठा” करते हे आता जग-जाहीर आहेच.... “पैसा बोलता है”, हे तर आपण नेहेमीच पाहतो. भले तो पैसा कुठल्याहि मार्गाने कमावलेला असेल.....आज पैश्याला नको तितका भाव आला आहे आणि पैशेवाल्याला त्याहूनही अधिक. प्रामाणिक पणा, कष्ट आणि प्रयत्न ह्याला दुय्यम स्थान असून श्रीमंती, धन दौलत श्रेष्ठ ठरते ... हे दिसून येते आणि म्हणून तर “भ्रष्टाचार” पसरतो, फोफावतो आणि एखाद्या रोगासारखा समाजाला पोखरून टाकतो..... आपण पैश्याला इतका मोठेपणा का दिला? हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे.

भाऊ-बंदकी, नाती-गोती, आप्त-संबंध ह्या साऱ्या गोष्टीही माणसाला मोठ करतात. धन संपत्ती नसूनही एखाद्या मंत्र्या-संत्र्याचा भाचा, आमदाराचा म्हेव्णा, मोठ्या नटाचा मुलगा ‘प्रसिद्ध होतो, मोठा होतो’ उगाचच.....आणि जग त्याला सलाम ठोकतं.... त्याचे गुण-गान गातं. असल्या मोठया माणसांचे प्रमाण हि आता वाढत चाललंय, हि सद्धा जरा चिंतेची बाब आहे.

सचिन तेंडूलकर, झकीर हुसैन, शेर्पा तेनसिंग, ध्यानचंद, लता दीदी हे मोठे का झाले? त्यांनी केलेल्या अलौकिक कामगिरीच्या निकषावर. वय नाही, नुसता पैसा नाही, नाती-संबंध नाही, पण कष्ट, मेहेनत आणि त्यांनी कामालेल्या पुरस्कारां-मुळे. त्यांच्या कडे एक special talent होतच, पण महत्वाची होती ती जिद्द, काहीतरी करून दाखवण्याची!

बिल गेट्स, मार्क झुकर्बर्ग, न्यूटन, शेक्सपियर हि नाव दिक्कालांची बंधनं तोडून जगात अजरामर होतात, तेव्हा त्यामागे असते लोक-विलक्षण बुद्धिमत्ता आणि प्रतिभा. त्यांना काहीतरी वेगळं करायचे होते.... ते त्यांनी केले.....प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन, अडथळ्यांचा सामोराकरून. विद्या महत्वाची असते .... पण त्याहूनही महत्वाचा असतो तो बुद्धीचा “उपयोग”, त्याचा प्रयोग .... आणि त्याचा “उपभोग”. Being at the right place at the right time, one has to feed on one’s own ideas, intelligence and intuition.

तर, माणूस मोठा अशा वेग-वेगळ्या कारणांनी होतो....आपला मार्ग आपणच निवडायचा आहे! शेवटी, सोक्रेटस म्हणाला आहे “Fame is the perfume of heroic deeds” …. तर आधी कर्तृत्व मग मोठेपणा!

-सुभग ओक

आणखी ब्लॉग