Sign In New user? Start here.

नावात काय आहे? भाग-२

नावात काय आहे? भाग-२

 

सुभग ओंक

प्रश्न पडला की ब्लॉग वर उगाच काहीही काय लिहायचं .... आणि ते लोकांना आवडायलाही पाहिजे (सुचलेलं नाव: ‘उगीच काहीतरी’), लोकांना ब्लॉग वर पुन्हा पुन्हा यावसं वाटलं पाहिजे. प्रथम वाटलं, ब्लॉग आपण आपल्यासाठी लिहू, निरीक्षण आणि स्मरण चांगलं असल्याने मला interesting अनुभव लक्षात राहतात ... कदाचित त्या आठवणी, ते अनुभव digital करण्याच्या हेतू ने हया ब्लॉग ची सुरुवात करू? मग वाटलं, आपण जे शिकलो, शिकतोय, अनुभवतोय, बघतोय आणि त्याचा आपल्यावर झालेला परिणाम वाचकां-कडून “validate” करू नाहीतर काहीतरी वेगळचं/abstract लिहू इथे ह्या ब्लॉग मध्ये. पण मग मनात आलं, की, माझा ब्लॉग ही माझी “identity” असला पाहिजे. मी कोण आहे.. कसा आहे ... काय आहे ... काय करतोय .... माझं वेगळेपण वाचकांच्या ध्यानी यायला हवं... तर वाचक हा ब्लॉग वाचतील .... वाचत राहतील. This blog should be combination of fiction, facts, experiences, thoughts, fun and anecdotes and can possibly be in English and Marathi J. अमेरिकेत राहून मला अस्खलित मराठी लिहिता येणार नाही .... हे वाचकांना आधीच कळलेलं बरं !

पण, माझं वेगळेपण असं आहे, की , अमेरिकेत राहूनही मी मराठीपण जपलय .... आणि त्याचा मला अभिमान वाटतो. “When in Rome, live like Romans” हे खरं असलं, तरी मी माझ्यातल्या मराठी माणसाला आजही जागं ठेवलय...आपली संस्कृती मला प्रिय आहे ... आणि माझ्या परीने मी तिची काळजी वाहतो. घरात “गणपती” ची स्थापना करतो, दिवाळीचे “लक्ष्मी पूजन” साजरे करतो, “सत्यनारायण” घालतो, कधी कधी “संकष्टी” चा उपास करतो ;) मराठी साहित्याची घेवाण-देवाण करतो आणि अमेरिकेत मराठी अस्मितेची माझ्यापरीने राखण करतो. हाच मराठीबाणा असाच पसरावा म्हणून हा माझा ब्लॉग. (सुचलेलं नाव: मराठीबाणा). आजही मला माझा देश, माझी मुंबई, माझा महाराष्ट्र प्रिय आणि जवळचा वाटतो. सचिन तेंडूलकरच्या १०० व्या शतकाची मी आजहि तितक्याच आतुरतेने वाट बघतोय!

- सुभग ओक

 
आणखी ब्लॉग