Sign In New user? Start here.

नावात काय आहे? भाग - ३

नावात काय आहे? भाग - ३

 

सुभग ओंक

मित्रहो, मी कोण, माझं वेगळेपण आणि मला ह्या ब्लॉग मध्ये काय मांडायचे आहे ते तुमच्या थोड-फार लक्ष्यात आले असेल.... (आलं नसेल तरी काही हरकत नाही..... आपल्याकडे भरपूर ब्लॉग्स आहेत, एकमेक्काना समजून घ्यायला....).

ह्या मराठी मातीतल्या रोपट्याला सध्या उन-वारा-पाणी इथे अमेरिकेत मिळतय... हे रोप इथे वाढतंय, त्याचं वृक्ष होतंय .... आणि ते झाड घडतानाचा आखो-देखा-हाल म्हणजे हा ब्लॉग. १० वर्षापूर्वी मी आलो...... सह्याद्रीच्या कुशीतून ....मायेच्या सावलीतून ....आपुलकीच्या त्या पावसाळ्यातून .... एका पाण्याच्या थेंबा सारखा....एकटाच...सगळ्यांना सोडून. आता ह्या थेंबाचा “नायगरा” झालाय.....अनुभवांच्या आणि जाणिवांच्या दुथडया भरून वाहतायत.....आणि त्या वाहणाऱ्या पाण्याला आता एक दिशा द्यायची आहे.

महाराष्ट्रामधून खूप मराठी माणसं अमेरिकेत आली. त्या सगळ्यांना कुठेतरी आपलासा वाटेल असा..... भारतातल्या मराठी माणसाला विचार करायला लावेल असा हा ...”सह्याद्रीचा नायगरा”..... हे दोन शब्द म्हणजे मी, हा ब्लॉग, माझं अस्तित्व, माझं मराठीपण. “सह्याद्रीचा नायगारा” ब्लॉग म्हणजे एक कारण आहे, निमित्त आहे, मार्ग आहे, माध्यम आहे, साधन आहे, प्रयत्न आहे ....वाचाकांना “नायगर्याचा” निखळ आनंद देण्याचा, त्यांना रोमांचित करण्याचा ..... आणि त्यात “सह्याद्रीचा” आपलेपणा ओतण्याचा.

मित्रहो/वाचकहो, ह्या नावाचे आपले “interpretation” जरूर कळवा. आपला संवाद सुरु व्हावा ही आग्रहाची विनंती.

- सुभग ओक

 
आणखी ब्लॉग