Sign In New user? Start here.

ऐन वसंतात अर्ध्या रात्री ....

 

सुभग ओंक

शेक्सपिअर हा बोलूनचालून कवीच. त्याच्या शब्दात लय, भाषेत जादू आणि भावनांमध्ये तरलता होती. डॉ. राजीव नाईकने ती नेमकी जोपासली आणि मी ती काळजीपूर्वक जपली. ह्या प्रेम-काव्यात एक अनोखा निरागसपणा आहे. खऱ्या-खोट्याच्या, वास्तव-स्वप्नाच्या सीमारेषा इथे विरघळतात, नाहीशा होतात. 'प्रेम' ह्या प्रकाराकडे थोडं तीर्केपणाने पाहणारे, प्रेमाची खिल्ली उडवणारे आहे हे नाटक!

ह्या नाटकाचे कथानक गुंतागुंतीचे आणि अत्यंत घट्ट बांधलेले असे आहे, एका प्रसंगातून, दुसरा प्रसंग समोर येतो.. उलघडत जातो ... त्यातच सारी गम्मत आहे. fantasy मुळे प्रेमाच्या धुंदीबद्दल, कैफाबद्दल ताशेरे येतात आणि शेवटी गोंधळलेले स्वप्न सरून सुबक वास्तव जागं होतं! स्वप्नमय वास्तव आणि वास्तविक स्वप्न ह्या दोन्ही गोष्टी मला भावल्या, लोकांच्या समोर उभ्या कराव्याशा वाटल्या!

निसर्ग, हा एक वृत्ती म्हणून ह्या नाटकात आहे, जीवनाचा एक भागच म्हणून इथे तो सामील झालाय! अहो, "चंद्र" इथे चक्क नाटकात एन्ट्री घेतो!! ह्या नाटकातला निसर्ग देखणा आहेच, पण तो महत्वाचा हि आहे, कारण तो "आनंद" देतो.... तोच आनंद मला प्रेक्षकांना द्यायचा आहे.

हास्य, करुण, राग, लोभ, निरागसता, शृंगार, मत्सर, दु:खं अशा सगळ्या नऊ-रसांचा आस्वाद देणारे हे अद्बुत-रम्य प्रहसन! शेवटी एकच, ह्या नाटकात म्हटलंच आहे "आम्ही आमची भोळीभाबडी कला तुमच्या समोर मांडतो आहोत, आमच्या शेवटची सुरवात करत आहोत" ....आणि हेच खरं...

प्रत्येक कलाकृती मी निष्ठेने, प्रामाणिक पणे सदर करतो ... ती लोकांनी भलेपणाने स्वीकारावी, हीच रंगदेवते कडे मन:पूर्वक प्रार्थना! हि कलेची जोपासना, आमची मेहेनत आणि चांगली दर्जेदार कलाकृती सदर करण्याची धडपड, आवडेल तुम्हाला नक्कीच, आहे मला खात्री .... ऐन वसंतात अर्ध्या रात्री!

-सुभग ओक

 
आणखी ब्लॉग