Sign In New user? Start here.

‘नमस्कार मी सुधीर गाडगीळ बोलतोय’ या सदरात तुमचं स्वागत...ह्यावेळी मी गप्पा करणार आहे त्या अभिनेत्री आणि गायिका असलेल्या किर्ती शिलेदार यांच्याबद्दल...किर्ती शिलेदार ह्यांच्या वयाची साठ वर्ष पूर्ण होत असून सोबतच मराठी रंगभूमीवर त्यांच्या कारकिर्दीला पन्नास वर्षही

 

गंधर्वांच्या कलेचा वारसा जपणारी किर्ती शिलेदार

Sudhir Gadgil
‘नमस्कार मी सुधीर गाडगीळ बोलतोय’ या सदरात तुमचं स्वागत...ह्यावेळी मी गप्पा करणार आहे त्या अभिनेत्री आणि गायिका असलेल्या किर्ती शिलेदार यांच्याबद्दल...किर्ती शिलेदार ह्यांच्या वयाची साठ वर्ष पूर्ण होत असून सोबतच मराठी रंगभूमीवर त्यांच्या कारकिर्दीला पन्नास वर्षही पूर्ण होत आहेत. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी ‘सौभद्र’ या संगीत नाटकातून आपल्या अभिनयाला सुरवात केली. इतकी वर्ष त्या हे करू शकल्या कारण त्यांच्या परीवारात गंधर्व सुरांची परंपरा आहे. त्यांचे वडिल जयरामची आणि त्यांची आई जयमालाबाई हे दोघेही बालगंधर्वां सोबत काम करीत होते. किर्ती शिलेदार यांच्या ह्याच कारकिर्दीवर मी आज बोलणार आहे.
 

सोप्या आणि सोयिस्कर मनोरंजनासाठी ‘PODCAST ’...

सध्याच्या घाई गर्दीच्या धकाधकीच्या जीवनात आपण घरापेक्षा ट्राफिक मध्ये जास्त वेळ काढतो. आजचे स्मार्ट फोन्स नुसते पीसीला कनेक्ट केले की फोन चार्ज होताहोता, नवीन ध्वनिमुद्रित साठवून घेतात. तुम्ही नोंद केलेल्या संकेत स्थळावरून दरवेळी नवीन कार्यक्रम आपोआप तुमच्या संगणकावर उतरतो. तुम्ही प्रवासात फावल्या वेळात तो कार्यक्रम तुमच्या सोयीने ऐकू शकता.हे कार्यक्रम सर्व साधारणपणे दहा मिनिटांचे असतात. आणि विविध विषयांच्या श्रोतृवर्गाला त्यांच्या आवडत्या विषयावर कार्यक्रम मिळू शकतील. वेगाने धावणा-या ह्या तंत्रज्ञानाच्या युगात, मराठी पताका मात्र सतत डौलाने मिरवते आहे. भारतात सर्व प्रथम व्यक्तिश: podcast चालू करण्याचा मान मराठी माणसाला मिळतोय.लोकप्रिय निवेदक आणि स्वतःच्या खास खुसखुशीत शैलीने अनेक कार्यक्रमांमध्ये जान आणणारे श्री. सुधीर गाडगीळ श्रोत्यांशी चौफेर गप्पा मारणार आहेत.

 
Google chrome users : install google podcast feed extension to view podcast
  Click here to install chrome extension

sudhir gadgil