Sign In New user? Start here.
3D is now closed
‘दिल दोस्ती दुनियादारी’ पुढच्या महिन्यात घेणार प्रेक्षकांचा निरोप
Maharashtra cha favorite kon
 
 

‘दिल दोस्ती दुनियादारी’ पुढच्या महिन्यात घेणार प्रेक्षकांचा निरोप.

‘होणार सून मी या घरची’ मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता या पाठोपाठ प्रेक्षकांच्या मनात घर करणारी "दिल दोस्ती दुनियादारी" मालिकाही लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. काही काळानंतर या मालिकेचे नवीन भाग प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. डोंबिवलीतील एका कार्यक्रमादरम्यान या मालिकेतील कलाकारांनी ही माहिती दिली.

संजय जाधव यांची छोट्या पडद्यावरची ही पहिली मालिका. या मालिकेचं वैशिष्ट म्हणजे नविन चेह-यांना यामध्ये प्राधान्य दिलं गेल. विनोद लव्हेकर यांच्या सारखा कसेलेला दिग्दर्शक त्याचबरोबर आशिष पाथरे आणि मनस्विनी लता रविंद्र यांच्या लेखणीतून "दिल दोस्ती दुनियादारीचा" चा जन्म झाला. माजघरात आज काय घडणार याची उत्सुकता सर्वाणांच असते. त्यामुळे ही मालिका बंद पडल्यावर याचा चाहता वर्ग नाराज होणार हे नक्कीच.

या मालिकेचा दुसरी इंनिंग सुरू होणार आहे. पण ती नक्की कधी सुरू होणार यावर मात्र अजुनही प्रश्नचिन्ह आहेत. या मालिकेच्या जागी कोणता कार्यक्रम असणार आहे हे गुलद्स्त्यात ठेवण्यात आलंय. तरुणाईचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या मालिकेतील आशु, सुजय, कैवल्य, मीनल, रेश्मा, अॅना या पात्रांनी तरुणाईचे मन अल्पावधीतच जिंकले होते. पहिल्या भागापासून प्रेक्षकांनी या मालिकेला पसंतीची पावती दिली होती.

--------------------