Sign In New user? Start here.
amey wagh nipun dharmadhikari brings marathi casting couch
मराठीतील पहिली वेब सिरीज ’कास्टींग काऊच विथ अमेय अ‍ॅण्ड निपुण’
LIGHT-HOUSE"
 
 

मराठीतील पहिली वेब सिरीज ’कास्टींग काऊच विथ अमेय अ‍ॅण्ड निपुण’

मराठी चित्रपट असो वा मराठी मालिका यामध्ये अनेक नवीन प्रयोग होताना दिसंत आहेत. पण मराठीतली वेब सिरीज हा प्रयोग पहिल्यांदाच केला जाणार आहे. ही मालिका उद्या पासून ऑनलाईन दिसणार असून या मालिकेचा व्हिडीऒ सध्या व्हायरल होताना दिसतं आहे. "कास्टींग काऊच विथ अमेय अ‍ॅण्ड निपुण" असं या मालिकेचं नाव आहे. या मालिकेमध्ये राधिका आपटे ही अभिनय करणार आहे. ११ वर्षापुर्वी , ते बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स मध्ये शिकत होते, त्यावेळी अमेय वाघ ने निपुण धर्माधिकारी यांच नाटक ’सायकल’ मध्ये अभिनय केला होता. आता हीच जोडी पुन्हा एकदा परत येत आहे, पण यावेळी मराठी वेबसिरीज घेऊन. त्यांच्याच कॉलेज मधील सिनीयर सारंग या मालिकेच दिग्दर्शन करत आहे. ही मालिका भारतीय डिजीटल पार्टी यांच्या बॅनर खाली तयार होत असून, उद्या पासून म्हणजे ५ एप्रिल पासून ही ऑनलाइन दिसेल.

amey wagh nipun dharmadhikari brings marathi casting couch

राधिका आपटे ही या मालिकेत अभिनय करणार आहे. फक्त पहिल्या ५ भागापर्यंत ती काम करणार आहे. मालिकेला प्रसिध्दी मिळावी म्हणून हा प्रयोग केला जाणार आहे. राधिका म्हणते की मी सांरग, अमय आणि निपुणला खूप चांगल्या प्रकारे ऒळखते. त्याच्या सोबत काम करणं हे काम नसून धमाल असते. या मालिकेचं शुटींग सितारा स्टुडीऒ मुंबईमध्ये केलं आहे. मराठी मध्ये अनेक नव नवीन प्रयोग होत आहेत. आणि त्यात सोशल मिडीया हा असा मिडीया आहे जो मोबाईलव्दारे प्रत्येकाच्या हातात असतो. त्यामुळे लोकांपर्यत पोहचंण सोप होतं. मराठीत केला जाणारा हा प्रयोग प्रेक्षकांच्या पंसतीस पडेल अशी तुर्तास तरी आशा करण्यास हरकत नाही.

--------------------